अध्यक्ष शालिनी विखेंनीच टाकला जि.प. सर्वसाधारण सभेवर बहिष्कार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी सैनिकांच्या पत्नीची सोयीनुसार बदली झाल्याने नाराज झालेल्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांनीच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला. माजी सैनिकांना न्याय देता येत नसेल, तर आम्हाला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, असे म्हणून त्यांनी सभागृह सोडले. आज दुपारी पावणेचार वाजता हा प्रकार घडला. या बहिष्कारामुळे एकच गोंधळ उडाला.

याबाबत माहिती अशी की, माजी सैनिक अपंग असल्यामुळे त्यांनी पत्नीची सोयीनुसार बदली करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांच्याकडेही केली. त्यानुसार अध्यक्षा विखे यांनी बदलीसाठी मुख्य कार्यकारी माने यांच्याकडे स्वतःही विनंती केली होती. परंतु, सदर बदली विनंतीनुसार झाली नाही.

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत आज दुपारी हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी सदर माजी सैनिकांच्या पत्नीची बदली नियमानुसारच केली आहे, असे सांगितले. ‘मला माझ्या आदेशात बदल करण्याचे अधिकार नाही. त्यांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागावी’, असेही माने म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांच्या या उत्तरावर अध्यक्षा विखे संतप्त झाल्या. त्या म्हणाल्या की, ‘आपण माजी सैनिकांच्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाहीत, याचा खेद वाटत आहे. मला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मी सभात्याग करीत आहे.’ असे बोलल्यानंतर विखे यांनी सभागृह सोडले. जिल्हा परिषद अध्यक्षांनीच सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद

दुष्काळी परिस्थतीत महावितरणकडुन विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा भगवा रंग योग्यच : रामदास आठवले

‘जय श्रीराम’ न बोलणाऱ्या तरुणास मारहाण

बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून दलित, वंचितांच्या जागा बळकावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश