PM नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’मध्ये ’त्या’ राष्ट्रपतींचा उल्लेख !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशाचे पंतप्रधान जनतेशी संवाद साधण्यासाठी ‘मन की बात’च्या माध्यमातून समोर येतात. यातून वेगवेगळे विषयांवर आपली मते मांडतात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका खंडामधील एक देश असलेल्या सुरीनामच्या राष्ट्रपती भारतीय वंशाचे चंद्रिका प्रसाद संतोखी यांचा उल्लेख केला. कारणही विशेष होतं, ते म्हणजे तेथील राष्ट्रपतींनी वेद घेऊन घेतलेली शपथ, हे होय.

राष्ट्रपतीपदावर विराजमान होताना संतोखी यांनी हातात वेद घेऊन मंत्रोच्चार करत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलीय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात याचा उल्लेख केला.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, चंद्रिका प्रसाद संतोखी हे सुरीनामचे नवे राष्ट्रपती बनले आहेत. ते भारताचे मित्र असून 2018 साली झालेल्या पर्सन ऑफ इंडियन ओरिजन पार्लियामेंट्री कॉन्फ्रन्समध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी शपथेची सुरुवात वेद मंत्रांच्या साक्षीने करून संस्कृत भाषेत बोलले आहेत.

चंद्रिकाप्रसाद संतोखी हे प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पार्टीचे नेते असून त्यांनी देशातील लष्करशाहा डेसी बॉउटर्स यांची जागा घेतलीय. बॉऊटर्स यांचा नॅशनल पार्टी ऑफ सुरीनाम मे महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये पराभूत झाला होता.

दरम्यान, संतोखी यांनी अशावेळी देशाच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. ज्यावेळी देशाचे नेदरलँड्ससह इतर पाश्चात्य देशांशी असलेले संबंध बिघडले असून देश यावेळी खूप संकटातून जातोय.

काळाच्या ओघात भारतातून मोठ्या प्रमाणावर देश-विदेशात स्थलांतर झाले आहे. दरम्यान, हे स्थलांतरीत लोक जिथे गेले तिथे त्यांनी स्थानिक संस्कृती आत्मसात केली. मात्र, भारतीय संस्कृती न सोडता तिचीही जोपासना देखील केली.

अमेरिका खंडामधील एक देश असलेल्या सुरीनाममध्ये नुकतेच भारतीय वंशाचे चंद्रिका प्रसाद संतोखी हे राष्ट्रपतीपदी विराजमान झालेत.

प्रत्येकवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेला नवी माहिती देत असतात. तसेच अनेक बाबी सांगत असतात. तसेच काहीवेळा थेट संवाद साधत असतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हापासून पंतप्रधान पदावर विराजमान झाले आहेत. तेव्हापासून त्यांनी आपला ‘मन की बात’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. तो आजतागयात सुरू आहे. देशाला संबोधित करताना तसेच इतर काही महत्वपूर्ण बाबींसंदर्भात सांगायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमाला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे देशात त्यांचा हा ‘मन की बात’ कार्यक्रम चर्चीला जात आहे.