Presidential Election 2022 | भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी उमदेवारी जाहीर, जाणून घ्या कोण आहेत द्रौपदी मुर्मू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Presidential Election 2022 | राष्ट्रपतीपदासाठी येत्या 18 जुलैला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने (BJP) चर्चा करुन एनडीएकडून (NDA) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (National President J.P. Nadda) यांनी याबाबत घोषणा केली. तर दुसरीकडे विरोधकांकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना राष्ट्रपतीपदाचे (Presidential Election 2022) उमेदवार बनवले आहे. राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलैला मतदान होणार असून 21 जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील.

 

याबाबत जे.पी. नड्डा म्हणाले, एनडीए घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पूर्वांचल भागातून कुणी उमेदवार असावं असं ठरवलं होते. त्यात आदिवासी (Tribal) भागातील महिला नेतृत्व द्रौपदी मुर्मू यांना संधी देण्यात आली आहे. आम्हाला आपेक्षा होती राष्ट्रपतीपदाची निवडणूक (Presidential Election 2022) बिनविरोध होईल मात्र विरोधकांनी त्यांच्या उमेदवाराची घोषणा आधीच केली असं त्यांनी सांगितलं.

 

कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
ओडिशा (Odisha) येथील आदिवासी समाजाचं नेतृत्व असलेल्या द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या सर्वाधिक काळ राज्यपाल (Governor of Jharkhand) राहिल्या आहेत.
त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल आहेत. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील राहणाऱ्या मुर्मू या दोनदा रायरंगपुर विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या आमदार होत्या.
भाजप आणि बीजू जनता दलाच्या सरकारमध्ये त्या मंत्री होत्या.

 

 

Web Title :- Presidential Election 2022 | bjp presidential candidate 2022 draupadi murmu pm narendra modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Purandar Upsa Irrigation Scheme | पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचे काम केवळ 40 दिवसात पूर्ण

 

Eknath Shinde | भाजपसोबत युती करणं काळाची गरज, एकनाथ शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; दोन नेत्यांमध्ये फोनवर संवाद

 

Maharashtra Political Crisis | ‘आमदारांना किडनॅप करुन सुरतला नेलं’- संजय राऊत