Presidential Election 2022 | ‘राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा’ – नाना पटोले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Presidential Election 2022 | देशात सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. राज्यसभेच्या निवडणुकांनंतर आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकीय वर्तुळात यावर खलबते सुरू झाली आहेत. दरम्यान, या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याकडे राजकीय जाणकार वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पहात आहेत. (Presidential Election 2022)

 

राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, शरद पवारांना जर राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केले, तर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल.

 

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकांनंतर आता देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. यामुळे विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजपाने आपआपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. (Presidential Election 2022)

 

यासाठी मतांची गोळाबेरीज सुरू झाली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध पक्षाची मोठ बांधण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी बॅनर्जी 15 जून रोजी दिल्लीत विरोधी पक्षाच्या नेत्यांची संयुक्त बैठक घेणार आहेत.

 

बॅनर्जी यांनी बैठकीसाठी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे पिनाराई विजयन,
ओडिशाचे नवीन पटनायक, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे एमके स्टॅलिन, झारखंडचे हेमंत सोरेन,
पंजाबचे भगवंत मान आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह 22 प्रमुख नेत्यांना पत्र पाठवले आहे.

 

Web Title :- Presidential Election 2022 | congress will support sharad pawar for presidential election says congress nana patole

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा