अमित शहा होणार राज्याचे ‘कारभारी’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील सस्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भाजपने सत्तास्थापने असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून निमंत्रण देण्यात आले. सोमवारी (दि.11) सत्तास्थापनेवरुन मोठ्या घडामोडी झाल्याचे पहायला मिळाले. काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात आल्याने शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र, दोन्ही काँग्रेसने पाठिंब्याचे पत्र दिले नसल्याने शिवसेनेची ही संधी हुकली.

शिवसेनेची सत्तास्थापनेची संधी गेल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रीत केले. मात्र, राष्ट्रवादीने मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसबरोबर चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगितले. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता बळकट झाली असल्याचे मत राजयकीय विश्लेकांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आमदारांचे पुरेसे समर्थन असल्याचे सिद्ध करण्यासाठी आज संध्याकाळी 8.30 पर्य़ंची वेळ दिली आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये यासाठी सर्वच पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. आघाडीला सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज आहे. मात्र, आघाडीने शिवसेनेला पाठिंब्याचे अधिकृत पत्र न दिल्याने शिवसेनेला सत्तास्थापन करण्यापासून दूर व्हावे लागले. आता राष्ट्रवादीने सत्तास्थापनेचा दावा केला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते.

कायदेतज्ज्ञांच्या मते संविधानातील कलम 172 अन्वये राज्यपालांना वेळीची मर्यादा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन करण्याचा दावा नाकारला तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती राजवटीत राज्यपाल हे केंद्र सरकारच्या वतीने कारभार पाहतात. हा विभाग केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे राष्टपती राजवटीत राज्याचे कारभारी अमित शहा बनू शकतात.

Visit : Policenama.com