सवर्ण आरक्षणाला राष्ट्रपतींची मंजुरी ; हे असणार लाभार्थी 

नवी दिल्ली : वृत्तसंथा – आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांच्या 10 टक्के आरक्षण विधेयकावर राष्ट्रपतींतर्फे स्वाक्षरी करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांच्या आरक्षण विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे.

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला होता. याबद्दलच विधेयक  लोकसभेत सादर करण्यात आले होते. त्यानंतर सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. इतकेच नवं  हे तर सवर्ण आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात आले होते. दरम्यान आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांच्या 10 टक्के आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी राष्टरापतींकडे पाठवण्यात आले होते. दरम्यान राष्ट्रपतींनी विधेयकावर स्वाक्षरी करून विधयेक मंजूर केले आहे.

कोण असणार आरक्षणाचे लाभार्थी ?

सध्या आरक्षण नसलेल्या उच्चवर्णीय मानल्या जाणार्या जाती.

वार्षिक उत्पन्न ८ लाखां पेक्षा कमी

५ एकरपेक्षा कमी शेतजमीन

१००० वर्गफूटापेक्षा कमी क्षेत्रफळाचे घर

अधिसूचित मनपा क्षेत्रात ६२७ फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाचा निवासी भूखंड

अश्या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना या आरक्षणाचा फायदा होणार आहे.

* कोणत्या सवर्ण जाती ठरणार लाभार्थी ?

*राजस्थान*

जाट                 १२ %

राजपूत            ७ %

ब्रह्मण               १२ %

मुस्लिम             ९ %

*गुजरात*

पाटीदार           १४ %

ब्राह्मण              ४ %

राजपूत / क्षत्रिय  ५ %

बनिया              ३ %

मुस्लिम             १० %

*मध्यप्रदेश*

ब्राह्मण              ९ %

राजपूत             ९ %

बनिया               २ %

मुस्लिम             ७ %

*बिहार*

ब्राह्मण            ६ %

राजपूत           ५ %

भूमिहार          ५ %

कायस्थ           २ %

मुस्लिम           १७ %