President’s Police Medal-Pune | पुणे शहर पोलीस दलातील तिघांना ‘गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल प्रकाश चौधरी, पांडुरंग वांजळे आणि विजय भोंग यांना पोलीस पदक’ जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – President’s Police Medal-Pune | भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या (Republic Day) औचित्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने (Union Home Ministry) पोलीस (Police), अग्निशमन (Fire Brigade), गृहरक्षक दलातील (Home Guard) कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलाने 7 शौर्य पोलीस पदक (Police Medal for Gallantry), 4 विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक (president’s police medal for Distinguished service) आणि 40 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (President’s Police Medal-Pune) पटकाविले आहे. यामध्ये पुणे पोलीस (Pune Police) दलातील तीन जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे.

 

पोलीस उपनिरीक्षक, विशेष शाखा प्रकाश भिला चौधरी (Special Branch PSI Prakash Bhila Chaudhary), सहायक पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा पांडुरंग लक्ष्मण वांजळे (Crime Branch ASI Pandurang Laxman Wanjle), लष्कर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय उत्तम भोंग (Lashkar Police Station ASI Vijay Uttam Bhong) यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. (President’s Police Medal-Pune)

 

पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी
विशेष शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी हे 2 जून 1987 रोजी पोलीस शिपाई या पदावर महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले. 1992 मध्ये बाबरी मस्जिद (Babri Masjid) पाडल्यानंतर उसळलेल्या जातीय दंगलीच्या (Riot) वेळी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) भागात शांतता व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली होती. त्यांना त्यांच्या 35 वर्षाच्या सेवाकालावधीत 165 बक्षिसे (Rewards) देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच 2011 मध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पदकाने (Director General of Police Medal) त्यांना सन्मानित करण्यात आले. ऑक्टोबर 2020 मध्ये प्रकाश चौधरी यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे.

सहा. पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग वांजळे
गुन्हे शाखेतील सहा. पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग वांजळे हे 15 ऑक्टोबर 1990 मध्ये पोलीस शिपाई या पदावर भरती झाले.
त्यांनी समर्थ पोलीस स्टेशन (Samarth Police Station), वाहतूक शाखा (Traffic Branch),
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन (Warje Malwadi Police Station)
येथे कर्तव्य पार पाडले असून सध्या ते खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा (Crime Branch Anti extortion Cell) येथे कार्यरत आहेत.
त्यांनी त्यांच्या सेवाकालावधीत एकूण 70 पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त केली असून पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्याची उत्कृष्ट कामगिरी केली.
वांजळे यांना त्यांच्या 32 वर्षाच्या सेवाकालावधीत 270 बक्षिसे देऊन गौरविण्यात आले आहे.
तसेच पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पदाकाने 2014 साली सन्मानित करण्यात आले आहे.

 

सहा. पोलीस उपनिरीक्षक विजय भोंग
लष्कर पोलीस ठाण्यातील सहा. पोलीस उपनिरीक्षक विजय उत्तम भोंग हे 1 एप्रिल 1990 रोजी पोलीस शिपाई या पदावर राज्य राखीव पोलीस बल गट (State Reserve Police Force) येथे भरती झाले.
1992 ते 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील (Maharashtra) नक्षल भागात (Naxal Area) उत्कृष्ट आणि खडतर सेवा त्यांनी बजावली आहे.
2017 साली जुगार अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकून 41 आरोपींना ताब्यात घेण्याची विशेष कामगिरी त्यांनी केली आहे.
त्यांच्या 31 वर्षाच्या सेवाकालावधीत 224 बक्षिसे देऊन गौरविण्यात आले आहे.
2021 मध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पदाकाने त्यांना गौरविण्यात आले आहे.

 

Web Title :- President’s Police Medal-Pune | Prakash Chaudhary, Pandurang Wanjle and Vijay Bhong awarded Police Medal for meritorious service to three members of Pune City Police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 6,299 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Train | पुणे-बारामती आणि बारामती ते दौंड रेल्वे गुरुवारपासून अंशत: होणार सुरु

 

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, द क्रिकेटर्स क्लब संघांची विजयी घौडदौड