कोटयावधी मोबाईल धारकांसाठी खुशखबर ! TRAI नं घेतला मोठा निर्णय, आता पाठवू शकता वाटेल तेवढे SMS

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने लॉकडाऊनदरम्यान करोडो मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता ट्रायने एका दिवसात मोफत एसएमएस पाठवण्याची मर्यादा पूर्णपणे बंद केली आहे. आता मोबाइल ग्राहक दिवसभरात हवे तेवढे एसएमएस मोफत पाठवू शकतात.

यापूर्वी लागत होता 100 एसएमएसनंतर चार्ज

यापूर्वी मोबाइल ग्राहकाला दिवसभरात केवळ 100 एसएमएसच मोफत होते. यानंतर त्यांना प्रति एसएमएस 50 पैसे शुल्क द्यावे लागत होते. ट्रायने यासाठी सर्व स्टेक होल्डर्ससाठी टेलिकम्युनिकेशन टॅरिफ (65वी दुरूस्ती) ऑर्डर 2020चा ड्राफ्ट जारी केला आहे.

यासाठी लागत होता चार्ज

2012 मध्ये लागू झालेल्या या नियमांतर्गत 100 एसएमएसनंतर 50 पैशांचा चार्ज लागत होता. हा चार्ज यासाठी लावला जात होता, की ग्राहकांकडे येणार्‍या बिनकामाच्या कमर्शियल मेसेजला प्रतिबंध लागावा. आता ट्रायने म्हटले आहे की, स्पाम मेसेजला रोखण्यासाठी आता योग्य टेक्नॉलॉजी आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी डिएनडी सुद्धा सुरू केले होते. या सर्व्हिसद्वारे यूजर्स आपल्या नंबरवर येणार्‍या जाहिरातींना रोखू शकतो.

Spam रोखण्यासाठी नवे तंत्रज्ञान

ट्राय मोबाइल कंपन्यांवर Spam मेसेज रोखण्यासाठी सतत नव्या पद्धती शोधण्यावर जोर देत आहे. 2017 मध्ये ट्रायने युसीसीवर रोख लावण्यासाठी टीसीसीसीपीआर सादर केले. ट्रायने म्हटले की, टीसीसीसीपीआर 2018 अंतर्गत निर्धारित नवीन रेग्युलेटरी फ्रेमवर्क टेक्नोलॉजीवर आधारित आहे. हे स्पाम एसएमएसवर अंकुश ठेवू शकते. ट्रायने टेलिकम्युनिकेशन्स टेरिफ (65वी दुरूस्ती) ऑर्डर, 2020 चा ड्राफ्ट तयार केला होता. यासाठी ट्रायने स्टेकहोल्डर्सकडून 3 मार्चपर्यंत लेखी प्रतिक्रिया आणि 17 मार्चपर्यंत काऊंटर प्रतिक्रिया मागवल्या होत्या. आता ट्रायने हा मोठा निर्णय घेतला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like