निकालापूर्वीच शिवसेनेकडून दबावतंत्र ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच दबावतंत्राचा वापर करणाऱ्या शिवसेनेकडून निकालापूर्वी देखील दबावतंत्राचा वापर सुरु आहे. विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोलनुसार यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळेल अशी स्थिती नाही. भाजप व्यतिरिक्त कोणताही प्रमुख पक्ष बहुमताच्या आकड्यापेक्षा अधिक जागा लढवत नाही. त्यामुळे स्पष्ट बहुमताची शक्यता कमी आहे. सर्वाधिक जागा लढवून देखील भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेने निकालाआधी पासूनच दबावतंत्र सुरु केले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपला दिला होता. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व कमी झाले. निकालानंतर शिवसेनेने भाजपला पाठिंबा देत सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेला मनासारखी मंत्रीपदे मिळवता आली नाहीत. त्यामुळे सत्तेत राहून ही भाजपवर टीका करत पाच वर्षे पूर्ण केली.

लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने युती केली. मतदानानंतर खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेला 100 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच शिवसेना आणि भाजपला एकमेकांशिवाय पर्याय नाही कारण भाजपने दोन-पाच जागा जिंकल्या तरीसुद्धा शिवसेनेशिवाय ते राज्य स्थापन करू शकणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले. त्यामुळे निकालाआधीच शिवसेनकडून दबावतंत्र सुरू करण्यात आले असल्याचे पहायला मिळत आहे.

Visit : Policenama.com