पुजार्‍यानं दोषमुक्त करण्याच्या बहाण्यानं ‘भागवलं’, केला 3 बहिणींवर ‘बलात्कार’

पोलीसनामा ऑनलाईन – मध्य प्रदेशातील सतना येथील एका पुजार्‍यानं एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींना दोष मुक्त करण्याच्या नावाखाली आपल्या वासनेचा बळी ठरविले. या प्रकरणी पीडितांच्या कुटूंबाने दिलेल्या माहितीनुसार, पूजा आणि कालसर्प दोष मुक्तीच्या बहाण्याने पुजाऱ्याने तिन्ही बहिणींना खोलीत नेले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. कुटूंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पुजारीला अटक केली आहे.

पुजारी ने दोष मुक्त करने के नाम पर मिटाई हवस, 3 बहनों से किया रेप

सतना जिल्ह्यातील मैहर गावात एका कुटुंबाने आपल्या मुलींच्या लग्नासाठी आणि काल सर्प दोषमुक्त होण्यासाठी पूजा केली होती. याच भागातील पुजारी नारायण स्वरूप पूजा करण्यासाठी घरी आले तेव्हा त्यांनी सुख-शांतीसाठी तिन्ही मुलींच्या पूजेसाठी एक खोली निवडली. यानंतर, पुजाऱ्याने खास पूजा आणि अनुचित प्रकारची भीती दाखवत या कुटुंबाला घराबाहेर पाठवले आणि एकामागून एक असे तीनही बहिणींना खोलीच्या आत बोलावले. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार खोलीच्या आत पुजारीने कपडे काढून तीन बहिणींवर बलात्कार केला.

बलात्कार केल्यानंतर पीडित मुलींनी त्यांच्या वडिलांना याबद्दल सांगितले. संपूर्ण प्रकार समजताच वडिलांनी पोलिस ठाण्यात जात आरोपी पुजारीविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तिन्ही बहिणींची वैद्यकीय केली आणि तक्रार नोंदवून पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याला अटक केली. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत कलम ५/६, ७/८ आणि आरोपीविरोधात कलम ३७६ (२)(४), ३७६ (ग) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/