IPS अधिकारी असल्याचे भासवून 70 लाखांची खंडणी उकळणारा भामटा गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करून शहरातील एका व्यावसायिकास फसविणाऱ्या भामट्यास मुंबई गुन्हे शाखेत गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने गजाआड केले आहे. या भामट्याने व्यावसायिकास 70 लाख रुपयांची खंडणीची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई मरिन ड्राईव्ह परिसरात करण्यात आली. संतोष मिसाळ असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे संतोष मिसाळ व संदिपकुमार मीना या नावाची सीबीआयची दोन बनावट ओळखपत्र व महाराष्ट्र शासनाचे मंत्र्यांचे स्वीय सहाय्यकाची ओळखपत्र जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिसिंग राव (वय-41) यांची रिया ज्वेलर्स या नावाने भागीदारीमध्ये सोन्याचे दागिने तयार व विक्री करण्याचा व्यवसाय आहे. दागिने तयार करून ते मुंबई व महाराष्ट्राबाहेरील ज्वेलर्सना विक्री करत असल्याने त्यांचे देशातील विविध ज्वेलर्स व्यवसायिकांची ओळख आहे. दरम्यान त्यांची हैदराबाद येथील मुसद्दीलाल ज्वेलर्शच्या मालकाशी ओळख झाली होती.

भारत सरकारने 2016 मध्ये नोटबंदी केल्यानंतर मुसद्दीलाल ज्वेलर्सचे मालक मोहनलाल गुप्ता यांचा लहान भाऊ कैलास गुप्ता यांच्या दोन मुलांना ईडीने अटक केल्याची माहिती हरिसिंग यांना सोशल मीडियातून मिळाली होती. दरम्यान हरिसिंग राव यांना एका इसमाने त्यांना फोन करून मुसद्दीलाल यांना मदत पाहिजे असल्यास एक माणूस मदत करू शकतो असे सांगितले. त्यावेळी त्यांना मोहनलाल गुप्ता यांना मोबाईल क्रमांक देऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

दरम्यान, 2019 मध्ये एका इसमाने हरिसिंग राव यांना संपर्क साधून तो भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी संदिपकुमार मीना असल्याचे सांगून गुप्ता परिवार त्यांच्या परिचयाचे असल्याचे सांगत पाच किलो सोने परत करण्यास सांगितले. सोने परत न केल्यास इंटेलिजन्स डिपार्टमेंटकून कारवाई करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने वारंवार फोन करून कारवाईची धमकी दिली. काही दिवसांनी संदिपकुमार मीना याने प्रकरण मिटवण्यासाठी राव यांच्याकडे दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली.

राव यांनी कारवाई टाळण्यासाठी 70 लाख रुपये देण्याची सहमती दर्शवली आहे. याची तक्रार राव यांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी सोमवार (दि.20) रोजी आरोपी संतोष मिसाळ उर्फ संदिपकुमार मीना याला हरिसिंग राव याच्याकडून 70 लाख रुपयांची खंडणी स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संतोष रस्तोगी, पोलीस उपायुक्त शहाजी उमाप व सहायक पोलिस आयुक्त शशांक सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनय घोरपडे, सहायक पोलीस निरीक्षक काझी, होवाळ, लोंढे, शेलार, पवार, गावंड यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा –