पश्चिम बंगालला ‘मिनी पाकिस्तान’ बनण्यापासून रोखावे : जेडीयू प्रवक्ते अजय आलोक

बिहार : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभेत सर्वात जास्त चर्चा पश्चिम बंगालची झाली ,बंगाल मध्ये जय श्रीराम घोषणेचा वाद दिवसेंदिवस वाढत असून आता JDU च्या एका नेत्याने जोरदार निशाणा साधला आहे त्यांनी पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान बनण्यापासून ममतादीदींनी रोखावे, असे आवाहन जेडीयू प्रवक्ते अजय आलोक यांनी केला आहे.

पुढे बोलताना आलोक म्हणाले कि, पश्चिम बंगालमधून बिहारी लोकांना बाहेर काढले जात आहे.तेथे सातत्याने हत्या होत आहेत. आणि ममता दीदी ह्या हिंसाचार संपवण्यात अपयशी ठरत आहे त्यामुळे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून ममता दीदींनी पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान होण्यापासून रोखावे, असे आवाहन आलोक यांनी ममता बॅनर्जी यांना केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी बिहारच्या बाहेर जेडीयू आणि एनडीए आघाडी करणार नाहीत त्यामुळे ममता बॅनर्जींनी बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नित कुमार यांना अभिनंदन आणि धन्यवाद केले होते. मात्र लोकसभेनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार संपवण्यात दीदींना अपयश येत असल्यामुळे तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा असा आरोप भाजप कार्यकर्त्याकडून केला जात आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

राग काढण्यासाठी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर ‘पंचिंग’ बॅग

#KuToo : हाय हिल्स विरोधात जपानमधील महिलांची मोहीम

डासांचा प्रादुर्भाव, मलेरिया रोखण्यासाठी ‘कोळी’च्या विषाचा उपाय

धक्कादायक ! प्रदूषणामुळे भारतात लाखो मुलांना गमवावा लागतो जीव