Corona संकटादरम्यान आलेल्या WHO च्या वक्तव्याने सर्वांना घाबरवले, सांगितले – ‘भारतात संसर्ग रोखणे अवघड’

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. रोज हजारो लोक या व्हायरसला बळी पडत आहेत. ज्यामुळे संक्रमितांचा आकडा दररोज वाढत चालला आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी आलेल्या एका व्यक्तव्याने चिंता आणखी वाढवली आहे.

भारतासाठी कोरोना रोखणे अवघड
डब्ल्यूएचओ इमर्जन्सीचे डायरेक्टर माईक रयान यांनी म्हटले, भारतात कोरोना ट्रान्समिशन कमी करणे खुप अवघड काम आहे. परंतु, आपण संसर्गाला लगाम घालण्यासाठी जे शक्य आहे ते करत राहीले पाहिजे. भारत सरकार सुद्धा यासाठी प्रतिबद्ध आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांत कोरोना कर्फ्यू आणि पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

कोरोनामुळे बिघडत चालली स्थिती
भारतात कोरोना महामारी सातत्याने गंभीर होत चालली आहे आणि अनेक राज्यांतून बेडपासून ऑक्सीजनच्या टंचाईच्या बातम्या येत आहेत. शुक्रवारी जारी कोरोना आकडेवारीवर नजर टाकली तर संपूर्ण देशात एका दिवसात विक्रमी 3,32,730 नवी प्रकरणे समोर आली. तर 2,263 मृत्यूंनंतर एकुण मृतांची संख्या 1,86,920 वर पोहचली आहे.