हेपाटाइटिस पासून बचाव करण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  हेपाटाइटिसपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. हे उपाय केल्याने हा आजार दूर रहाण्यास मदत होईल. बाजारातून फळे आणि भाज्या आणल्यानंतर त्या चांगल्या प्रकारे धुऊन घ्याव्यात. भाज्या शिजवून खाव्यात.  हेपाटाइटिसच्या व्हायरसचा खूप लवकर परिणाम होतो. यापासून वाचण्यासाठी कोणते उपाय आहेत, त्याविषयी माहिती घेऊयात.

बाहेर जाताना आपली पाण्याची बाटली सोबत घेऊन जा किंवा मिनरल वॉटरच प्यावे. ‘ हेपाटाइटिस ए’ चे व्हायरस शरीराच्या बाहेरही बऱ्याच महिन्यांपर्यंत राहू शकतात. यासाठी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. तुमच्या हातांना नेहमी अँटीबॅक्टिरिअल साबण, लिक्विड, हँडवॉश किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करा. कधीही दुसऱ्याची सौंदर्य प्रसाधने वापरू नका. ज्यांची सौंदर्य प्रसाधने तुम्ही वापरली त्यांना  हेपाटाइटिस  हा आजार जरी नसला तरी त्यांच्या शरीरात याचा व्हायरस असेल तर याचा तुम्हाला संसर्ग होऊ शकतो.