सहकारनगर व स्वारगेट परिसरातील २ सराईत तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सहकारनगर व स्वारगेट परिसरातील २ सरीत गुंडांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिले आहेत.

ऋषिकेश उर्फ सोन्या रविंद्र शिंदे (वय २२, पद्मावती) असे सहकारनगरमधील सराईत गुंडाचे नाव असून त्याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर पोलीस आय़ुक्तालय व जिल्ह्यातून १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात जखमी करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तर आकाश महेंद्र पाटील (वय २६, रा. महर्षिनगर) असे स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुंडाचे नाव आहे. त्याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयत व जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यावर शहरात मुलींचा विनयभंग करणे, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्रे बाळगणे, शिवीगाळ करून मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तडीपार केलेल्या काळात दोघेही शहरात दिसून आल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यास देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Loading...
You might also like