आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून तडीपार गुन्हेगारांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा आणि काही दिवसांवर आलेला गणेशोत्सव, नवरात्र या महत्त्वाच्या सणांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या तीन तडीपार गुन्हेगारांना अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने केली आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आरोपी राहण्याचे ठिकाणी न राहता पुण्यामध्ये अस्तित्व लपवून रहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे गुन्हे शाखेच्या सर्व युनिट शाखांना तडीपार गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. गुन्हे शाखा युनिट ४च्या पथकातील पोलीस कर्मचारी राजू मचे यांना तडीपार गुन्हेगार शहरात असल्याची माहीती मिळाली.

गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने शहरामध्ये तडीपार गुन्हेगारांचा शोध घेऊन खडकी आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडपीर केलेल्या तीन गुन्हेगारांना अटक करण्यात आली. महेश दिलीप गोरे (वय-२० रा. बोपोडी), आशिष संजय लोखंडे (वय-२२ रा. बोपोडी), हैदर हुसेन उर्फ शफान इराणी (वय-२३ रा.शिवाजीनगर) यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजू मचे, शंकर पाटील, सचिन ढवळे, गणेश काळे, अतुल मेंगे, राकेश खुवे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –