स्त्रीच्या सुरक्षिततेची गोष्ट ! ; जजमेंटचा थरारक ‘ट्रेलर’ आऊट

मुंबई : वृत्त संस्था – निला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’ या कादंबरीवर आधारित ‘जजमेंट’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला आहे. यात मंगेश देसाई, तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर यांची झलक पाहायला मिळते आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर एकूणच चित्रपटाची कथा काय असेल याचा अंदाज येतो. बापाच्या अत्याचारामुळे मृत्यू झालेल्या आपल्या आईला न्याय मिळवून देणारी मुलगी. आणि तिची धडपड, तिला येणाऱ्या अडचणी, क्रूर बाप असे सर्व कदंरीत चित्रपटाच्या ट्रेलरवरून लक्षात येते.

काय आहे ट्रेलर

माझ्या जीवाला धोका आहे ! अशा आवाजाने चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. हा आवाज अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा आहे. मंगेश देसाई या चित्रपटातुन पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका बजावत आहेत. मंगेश देसाई तेजश्रीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात आपल्या पत्नीला क्रूरपणे मरणाऱ्या पतीची भूमिका त्यांनी बजावली आहे.

आईच्या हत्येनंतर निर्दोष सुटलेल्या बापाची केस तब्बल १५ वर्षानंतर तेजश्रीकडून रीओपन करण्यात येते. आता वकील झालेली मुलगी आपल्या बापाविरुद्ध केस लढवून पुरावे नसताना मृत आईला न्याय देईल का ? याचा उलघडा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.

निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण ह्यांची ओळख आहे. य समीर रमेश सुर्वे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. २४ मे रोजी ‘जजमेंट’ प्रदर्शित होणार आहे.