8 हजार रुपयांपेक्षाही स्वस्तात मिळतोय 6000mAh बॅटरीचा दमदार स्मार्टफोन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या स्मार्टफोनमध्ये नवनवे टेक्नॉलॉजी पाहिला मिळत आहे. पण अशा अनेक स्मार्टफोनची किंमत जास्त असते. मात्र, 6000 mAh चा स्मार्टफोन 8 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळत आहे. फ्लिपकार्टवर Tecno Unstoppable Days सेल सुरु आहे. ज्यामध्ये अनेक स्मार्टफोन स्वस्तात आहेत. या स्मार्टफोनमध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

जर तुम्ही बजेट फोन खरेदी करण्याचा प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला 6000 mAh दमदार बॅटरीचा स्मार्टफोन मिळू शकेल. हा स्मार्टफोन ग्राहकांना परवडणाऱ्या दरात म्हणजे 8 हजार रुपयांपेक्षाही कमी रुपयांत मिळेल. ही तुमच्यासाठी शेवटची संधी असू शकते. Flipkart वर Tecno Unstoppable Days सुरु आहे. या सेलची सुरुवात 12 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती आणि आजचा 15 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस असेल. त्यामुळे जर तुम्हाला स्वस्तात स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली डिल्स असणार आहे.

सध्या टेक्नोच्या स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. मात्र, 6000 mAh बॅटरी क्षमता असणारा स्मार्टफोन स्पार्क पॉवर 2 एअर हा सर्वात स्वस्तात मिळत आहे. टेक्नोने स्पार्क पॉवर 2 एअरला गेल्या वर्षी 8,499 रुपयांत लाँच केला होता. मात्र, आता हा स्मार्टफोन फक्त 7,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.

असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स
– डिस्प्ले – 7 इंच HD+ इनसेल IPS
– कॅमेरा – 13MP, 2MP, 2MP
– फ्रंट कॅमेरा – 8 MP
– प्रोसेसर – मीडियाटेक Helio A22 क्वाड कोर
– अँड्राईड – 10
– RAM – 3 GB + 32 GB
– एक्सपांडेबल स्टोरेज – या स्मार्टफोनचे स्टोरेज 256 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.