सर्वसामान्यांना धक्का ! ‘या’ कारणामुळं हॅन्ड सॅनिटायझरची किंमत होणार नाही कमी, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हँड सॅनिटायझरवरील जीएसटीमध्ये घट होण्याची अपेक्षा असणाऱ्या व्यवसायिकांना धक्का बसू शकतो. सरकार जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत खाली आणेल असा उत्पादकांचा समज आहे. परंतु सरकार असा कोणताही निर्णय घेणार नसल्याची माहिती अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान 18 टक्केऐवजी काही उत्पादक 12 टक्के जीएसटी लागू करीत आहेत.

सॅनिटायझरवर 12% GST लावला पाहिजे
कमी जीएसटीच्या बहाण्याने कर चुकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता जीएसटी कमी घेणाऱ्यांची चौकशी केली जाईल. 18 टक्के जीएसटी चुकीचा असल्याचे उत्पादक सांगत आहेत. ते म्हणतात की, औषधाच्या वापरामुळे सॅनिटायझरवर 12 टक्के जीएसटी लावला पाहिजे. हॅन्ड सॅनिटायझरच्या किमतीवर आता कॅम्पिंग आहे. 200ML ची कमाल किंमत 100 रुपये आहे.

सॅनिटायझरवर केली जातेय कर चोरी
जीएसटीच्या सर्व प्रधान मुख्य आयुक्तांना आणि मुख्य आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात जीएसटी इंटेलिजेंस युनिटने म्हटले आहे की, काही साखर कारखाने आणि डिस्टिलरीज अल्कोहोल-आधारित हँड सेनिटायझर्सची निर्मिती आणि पुरवठा करीत आहेत. ते या जीएसटीचे HSN Code 3004 मध्ये वर्गीकरण करीत आहेत , ज्यावर केवळ 12 टक्के जीएसटी लागतो, तर सॅनिटायझर HSN Code 3808 अंतर्गत येतात, ज्यावर 18 टक्के जीएसटी लागतो.

दरम्यान, सरकारने आवश्यक वस्तूंच्या यादीतून मास्क व सेनिटायझर्स हटविले आहे. कोरोना विषाणूचे संकट निर्माण होताच देशात मास्क आणि सेनिटायझर्सची मागणी वाढली. हे लक्षात घेता सरकारने 100 एमएल सॅनिटायझरच्या किंमती 100 रुपयांपेक्षा जास्त न वाढवण्यास सांगितले तेव्हा सरकारने त्यांना आवश्यक वस्तूंच्या यादीमध्ये समाविष्ट केले. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये समाविष्ट केल्याने कोणत्याही प्रकारच्या काळा बाजारावर बंदी लागते.