Delhi : महागाईचा भडका ! LPG घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महागला, उद्यापासून नवीन किंमती लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची राजधानी दिल्लीतील लोकांना महागाइचा मोठा धक्का बसला आहे. दिल्लीत एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाल आहे. सोमवारी दुपारी 12 नंतर नवीन किंमती लागू होणार आहेत. त्यामुळे आता दिल्लीकरांना नवीन दराने गॅस सिलिंडर घ्यावा लागणार आहे. 50 रुपयांनी दरवाढ झाल्यानंतर दिल्लीत 14.2 किलो सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर 769 रुपये एवढी होणार आहे.

दरम्यान, पूर्व दिल्लीत विना अनुदानीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपयावरुन 719 रुपये एवढी झाली आहे. याशिवाय डिसेंबर 2020 मध्ये दिल्लीत एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा 50 रुपयांची वाढ झाल्याने नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे.