सर्वसामान्यांना मोठा झटका ! 15 दिवसात दुसर्यांदा वाढले LPG गॅस सिलेंडरचे दर, आज इतक्या रूपयांनी महागला
नवी दिल्ली : मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. सरकारने पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 50 रुपये प्रति सिलेंडर वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीत विना अनुदानित 14.2 किलोग्रॅम एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत वाढून 694 रुपये झाली आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 15 दिवसांमध्ये ही दुसरी वाढ आहे. याशिवाय, 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या भावात 36 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या किंमती आजपासून लागू झाल्या आहेत. यापूर्वी, तेल कंपन्यांनी 3 डिसेंबरला गॅस सिलेंडरच्या भावात 50 रुपयांची वाढ केली होती.
15 दिवसात 100 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर
15 दिवसात गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 100 रुपयांची तेजी आली आहे. 3 डिसेंबरला एलपीजी गॅस सिलेंडरच्या भावात 50 रुपयांची वाढ झाली होती. तर आज पुन्हा एकदा गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. अशाप्रकारे 15 दिवसात गॅस सिलेंडर 100 रुपयांनी महागला आहे.
14.2 किलोग्रॅम गॅस सिलेंडरची नवीन किंमत
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्लीत 14.2 किलोग्रॅम एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत वाढून 694 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. अगोदर याची किंमत 644 रुपये प्रति सिलेंडर होती. तर, कोलकातामध्ये 720.50 रुपये, मुंबईत 694 रुपये आणि चेन्नईत 710 रुपये झाली आहे.
19 किलोग्रॅम सिलेंडरचा नावा भाव
19 किलोग्रॅमच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या भावात 36 रुपयांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत या सिलेंडरचा रेट 1332 रुपये आहे. कोलकातामध्ये 19 किग्रॅ गॅस सिलेंडरचा भाव वाढून 1,387.5 रुपये, मुंबईत 1280 रुपये आणि चेन्नईत 1446.5 रुपये झाला आहे.
येथे चेक करा एलपीजी सिलेंडरचे दर
स्वयंपकाच्या गॅसचे दर चेक करण्यासाठी सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जा. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन रेट जारी करतात. https://iocl.com/TotalProductList.aspx या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या शहरातील गॅस सिलेंडरचे रेट चेक करू शकता.