राज्यात मास्क आणि सॅनिटायझरचे दर येणार निम्म्यावर !

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच ‘एन 95’मास्क आणि सॅनिटायझरचे दर निम्म्याने कमी करण्याबाबत राज्याच्या आरोग्य मंत्रालयाचा विचार सुरू आहे. त्यासंदर्भात येत्या आठवडयात निर्णय होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक समिती नेमली होती. त्यानुसार निर्णय घेण्यात येणार आहे.

समितीने तीन दिवसांत अहवला देणे अपेक्षित होते. मात्र एन-95 मास्क बनविणार्‍या महाराष्ट्रातील दोन मोठया कंपन्यांनी सुरवातीला समितीला सहकार्य करण्यास नकार दिला. कोरोनापूर्वी जी एन-95 मास्क 25 रुपयांना मिळत होेते. मात्र, कोरोनाकाळात त्याची किंमत 175 रुपये कशी झाली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न समितीने केला. मात्र त्यांना संबंधित कंपनीकडून काहीही माहिती मिळत नसल्याने टोपे यांनी साथरोग नियंत्रण कायदा 1897 तसेच अन्य कायद्यांचा आधार घेत थेट कंपनीत जाऊन तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार कंपनीचे दप्तर तपासण्यासह, कच्चा मालाचे, मजुरीचे दर वाढले का, अशा सर्व गोष्टी तपासण्यात आल्या. त्यामुळे येत्या आठवडयात एन-95 मास्कसह सॅनिटायझरचे दर अपेक्षेहून कमी झालेले दिसणार आहेत.