1 जानेवारीपासून ‘या’ वस्तू होतील महाग, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण घरगुती उपकरणे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर १ जानेवारी २०२१ पूर्वी खरेदी करा. कारण नवीन वर्षात टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीनसोबत इतर काही घरगुती उपकरणे महाग होणार आहेत.१ जानेवारीनंतर आपण ही उत्पादने खरेदी केल्यास आपल्याला जास्त किंमत मोजावी लागेल. असे म्हटले जात आहे की या उत्पादनांच्या किंमतींमध्ये सुमारे १० टक्क्यांनी वाढ होऊ शकते. यासह तांबे, अ‍ॅल्युमिनियम व स्टीलच्या किंमतीही वाढल्या आहेत. या कारणांमुळे किंमती वाढू शकतात जाणून घ्या..

_या कंपन्यांनी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला
या अहवालानुसार जागतिक विक्रेत्यांकडून पुरवठा कमी झाल्यामुळे टीव्ही पॅनल्सच्या किंमतीत २०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे उत्पादकाचे म्हणणे आहे. याशिवाय क्रूडच्या वाढत्या किंमतींमुळे प्लास्टिकही महाग झाले आहे. या कारणामुळे काही टीव्ही निर्माता कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात पॅनासोनिक इंडिया, एलजी आणि थॉमसन या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या जानेवारीपासून त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढवतील. त्याचबरोबर सोनी कंपनीचे म्हणणे आहे की ती सध्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. त्यानंतरच ती किंमतींबाबत निर्णय घेईल.

_या कंपन्यांची उत्पादने ७ ते ८ टक्क्यांनी महाग होतील
नवीन किंमतींबद्दल बोलताना पॅनासॉनिकची उत्पादने जानेवारीपासून ७ ते ८ टक्क्यांनी महाग होऊ शकतात. त्याचबरोबर एलजी इलेक्ट्रॉनिक्सची उत्पादने जानेवारीपासून सात ते आठ टक्क्यांनी महाग होतील. यात टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रिज यासारख्या उत्पादनांचा समावेश असेल.

_या कंपन्यांचे टीव्ही २० टक्क्यांनी महाग होतील
थॉमसन आणि कोडक यांच्या ब्रँड सुपर प्लास्ट्रोनिक्सच्या टीवीच्या खुल्या विक्री किंमतीत २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारपेठेतही त्याची कमतरता असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या कारणामुळे दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या एंड्रॉइड टीवीच्या किंमती २० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन किंमती जानेवारीपासून लागू होतील. कंपन्यांचे म्हणणे आहे की कोरोनामुळे खाणकाम कमी झाले ज्यामुळे आवश्यक धातूंच्या किंमती वाढल्या. याशिवाय शुल्कामध्ये पाच ते सहा पट वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत उत्पादनांच्या किंमती वाढविणे ही त्यांची सक्ती बनली आहे.