
सर्वसामान्यांच्या खिशाला ‘झळ’ बसणार; जुलैमध्ये ‘या’ वस्तू 10 टक्क्यांनी महागण्याची शक्यता
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Electronic | कोरोनामुळे आर्थिक संकट ओढवले आहे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. तर अनेकांवर पगार कपातीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यातच आता ग्राहकोपयोगी वस्तूंच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक वस्तूं (Electronic Items)च्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जुलैपासून टीव्ही, (Tv) फ्रिज, (Fridge) एसी, (AC) लॅपटॉप (Laptop) चे दर वाढू शकतात.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update
कोरोनामुळे लॉकडाऊ (Lockdown) न लागू करण्यात आला होता. त्यामुळे सुट्या भागाचे उत्पादन घटले. किमतीही वधारल्या. रिटेल दुकानं निर्बंध शिथिल झाल्यानं सुरू झाली आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध स्वरुपाच्या ऑफर दिल्या जात आहेत. विक्री वाढण्यासाठी दुकानदारांचे प्रयत्न सुरू आहेत. कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या किमतींमध्ये २०२१ मध्ये आतापर्यंत दोनदा वाढ केली आहे. त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मायक्रोप्रोसेसर आणि पॅनलची कमतरता, कच्च्या मालासह तांब्याच्या किमतीत झालेली वाढ, सुट्या भागांवरील वाढवण्यात आलेली कस्टम ड्युटी या सर्व कारणांमुळे जुलैमध्ये इलेक्ट्रॉनिक(Electronic) वस्तूंची किंमत १० टक्क्यांनी वाढू शकते.
सध्या वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण यामुळे लॅपटॉपची मागणी वाढली आहे. त्यामुळे त्याच्या किमतीतही ५ ते ७ टक्क्यांची वाढ झाली असून ती कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाली आहे त्यामुळे कंपन्याही कमीत कमी दरवाढ करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे दरवाढीचा बोजा ग्राहकांबरोबर कंपन्याही सोसत आहेत.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update
Web Title : prices products laptops tvs fridges may increase 10 percent july
धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित