‘या’ नव्या सुविधेमुळे आता थेट डॉक्टरांनाच लागणार फोन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सर जे. जे. रुग्णालयात आता थेट संबंधित विभागातील डॉक्टरांशीच संपर्क साधता येणार आहे. कारण या रुग्णालयात पीआरआय ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. जे. जे. रुग्णालयाच्या २३७३५५५५ या क्रमांकांवर फोन करून दूरध्वनी चालकामार्फत डॉक्टरांशी संपर्क साधला जात असे. मात्र रुग्णांची गर्दी वाढल्यानं दूरध्वनी चालकामार्फत डॉक्टरांशी संपर्क साधण्यासाठी विलंब होतो.

त्यामुळे रुग्णालयानं मुंबई महानगर टेलिफोनकडून २ स्वतंत्र अशा २३२२-२२०० आणि २३२२-२५०० या क्रमांकाच्या पीआरआय लाईन्स उपलब्ध करून घेतल्या आहेत. हे नंबर रुग्णालयातील प्रत्येक विभागाच्या बाहेर तसंच जागोजागी लावण्यात आले आहेत. तरी या सेवेचा जास्तीत जास्त फायदा रुग्णांनी आणि जनतेनं घ्यावा, ज्याममुळे आरोग्य सेवेत विलंब निर्माण होणार नाही असे दूरध्वनी आणि इंटरनेट प्रमुख डॉ. अभिजीत जोशी आणि अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी म्हटलं आहे.

या दोन्ही नंबरवर रुग्णालयातील आणि महाविद्यालयातील एक्स्टेंशन सेवा उपलब्ध होईल. एखाद्या रुग्णास एखाद्या डॉक्टरची भेट घ्यायची असल्या पहिले ४ क्रमांक (०२२) २३२२ हे डायल करून नंतर त्या विभागाचा एक्स्टेंशन नंबर डायल केला की रुग्णाचा थेट त्या डॉक्टरशी संपर्क होईल. वरील सेवा ही रुग्णालयातील  प्रशासकीय भवन, वसतीगृह, कँटिन  तसंच इतर विभागात कार्यान्वित असल्यानं रुग्णालयातील कोणत्याही विभागाशी किंवा व्यक्तींशी संपर्क साधणं सहज सोपं होईल.

ह्याही बातम्या वाचा-

धक्कादायक ! वीट कामगाराला खायला लावली ‘विष्ठा’ 

कोंढव्यातील प्लॉस्टिकच्या गोडावूनला भीषण आग ; गोडावूनसह १ रिक्षा, १ स्कुलव्हॅन भस्मसात 

‘त्या’ प्रकरणी महापालिका, रेल्वे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मशिदीमध्ये गोळीबार ; ६ जणांचा मृत्यु  

पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा