Murder at Mumbai’s Dahisar Jewelers | मुंबईच्या दहिसरमधील ज्वेलर्सला भरदिवसा गोळ्या घालून दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधाराला मध्यप्रदेशातून अटक

मुंबई न्युज (Mumbai news) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Murder at Mumbai’s Dahisar Jewelers  दहिसर येथील ओम साईराज ज्वेलर्स या दुकानात भर दिवसा शिरुन ज्वेलर्सवर गोळ्या झाडून त्याचा खुन (Murder at Mumbai’s Dahisar Jewelers ) करुन दरोडा टाकल्या प्रकरणात मुंबई पोलिसां (Mumbai Police) नी मुख्य सुत्रधाराला मध्य प्रदेशातून अटक (Arrest) केली. बंटी पाटीदार (Banty patidar) असे त्याचे नाव आहे. बंटी व त्याच्या साथीदाराला मध्य प्रदेशातून अटक केली असून आतापर्यंत या प्रकरणात एकूण ७ जणांना अटक केल्याचे दहिसर पोलिसां (Dahisar Police) नी सागितले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

दहिसर पूर्व येथील गावडेनगरमध्ये ओम साईराज ज्वेलर्स (Om Sairaj Jewelers) हे दुकान आहे. ३० जून रोजी सकाळी अकरा वाजता मास्क घातलेले तिघे जण स्कुटीवरुन आले. ओम साईराज ज्वेलर्स (Om Sairaj Jewelers) च्या दुकानात शिरले. त्यांनी दुकानमालक शैलेंद्र पांडे (वय ४६) (Shailendra Pandey) यांना पिस्तुलाचा धाक दाखविला. त्यांनी विरोध करताच चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. पांडे जागीच कोसळले. चोरट्यांनी दुकानातील सोन्याचे दागिने असलेली बॅग घेऊन ते स्कुटीवरुन पसार झाले होते. पांडे यांचा जागीच मृत्यु झाला होता.

दहिसर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता स्कुटीवरुन ट्रिपल सीट जाणारे तिघे त्यात कैद झाले. या सीसीटीव्ही फुटेजवरुन मुंबई पोलिसांनी पुढच्या १२ तासातच चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले होते. याबाबत सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, लुट करणारे हे तिघे जण असले तरी या गुन्ह्याच्या कटकारस्थान मोठे आहे. दहिसर पोलिसांनी यामागील सुत्रधारांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.

Web Title : Prime accused Bunty Patidar and one of his associates have been arrested from Madhya Pradesh. A total of 7 accused arrested in the June 30 case of robbery and murder at a jewellery shop in Mumbai’s Dahisar area: Dahisar Police

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या तिप्पट, जाणून घ्या आकडेवारी

BJP-Shivsena Alliance | भाजप-शिवसेना एकत्र येणार का?, फडणवीसांचं सूचक विधान अन् चर्चेला उधाण (व्हिडिओ)

Pimpri Corona News : पिंपरी चिंचवड शहरात आज 259 नवीन रुग्णांची नोंद, 205 ‘कोरोना’मुक्त रुग्णांना डिस्चार्ज