Coronavirus : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सहकारी महिलेला ‘कोरोना’ची ‘लागण’, 25 मार्चला झाली होती ‘मुलाखत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनचे पीएम बोरिस जॉनसन हे कोरोना संक्रमित आढळल्यानंतर आता इज्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे एक जवळचे सहकारी देखील कोरोना पॉजिटीव्ह आढळले आहेत. इज्राइल सरकारने याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही कि मागच्या काही दिवसात नेतान्याहू या महिलेच्या संपर्कात आले होते कि नाही. पण असे मानले जात आहे की, नेतान्याहू यांची टेस्ट केली जाईल आणि निगेटिव्ह आल्यावर काही काळासाठी ते सेल्फ आयजोलेशन मध्ये जाऊ शकतात.

एका वृत्तसंस्थेनुसार, नेतान्याहू यांचे जवळचे सल्लागार रिविका पालुख (Rivka Paluch) पॉजिटीव्ह आढळल्या असून त्यांचे वय ६४ वर्षे आहे आणि त्या अल्ट्रा ऑर्थोडॉक्स प्रकरणात पीएम नेतान्याहू यांच्या सल्लागार आहेत. सरकारी सूत्रांनुसार, सगळे लोकं जे मागच्या काही दिवसात रिविका यांच्या संपर्कात आले होते त्यांना हेल्थ गाइडलाइन्स नुसार, १४ दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवणार आहे.

अनेक नेत्यांना भेटल्या होत्या रिविका
रिविका यांची गुरुवारी अनेक मोठ्या नेत्यांसोबत भेट झाली होती. असे सांगितले जात आहे की, २५ मार्चला नेतान्याहू यांनी जेव्हा देशाला संबोधित केले होते तेव्हा रिविकाही तेथे उपस्थित होत्या. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे कि रिविका यांची २५ मार्चला नेतान्याहू यांच्याशी भेट झाली होती, पण विधानात सांगितले गेले की, दोघांनी सोशल डिस्टंसिंगमुळे एकमेकात अंतर ठेवले होते.

पीएम ऑफिसनुसार, काही आठवड्यांपासून नेतान्याहू यांना भेटायला येणारा प्रत्येक जण सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत होता. याअगोदर रिविका यांच्या कुटुंबातील एक सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. रिविका यांच्या पतीलाही कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इस्राईलमध्ये आतापर्यंत कोरोना संसर्गाची ४३४७ प्रकरणे नोंदवली गेली असून यामुळे १५ लोकांचा मृत्यू झाला आहे.