आता ‘या’ देशात देखील वापरता येणार ‘RuPay’ कार्ड, जाणून घ्या कार्डच्या ‘या’ 5 खास गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील अनेक बँका आपल्या ग्राहकांना अमेरिकन कंपनी वीजा आणि मास्टरकार्डचे पर्याय देतात. परंतू आता बँका ‘रुपे’ चा देखील पर्याय ग्राहकांना देत आहे. रुपे कार्ड डेबिट आणि क्रेडिट कार्ड अशा दोन्ही पर्यायात उपलब्ध आहे. बँकांकडून रुपेला देण्यात येणाऱ्या प्राधान्यामुळे याद्वारे होणाऱ्या ट्रांजेक्शनमध्ये वाढ होत आहे. आता यात आणखी एक उपलब्धी करुन देण्यात आली आहे. आता रुपे भूतानमध्ये देखील वापरता येणार आहे. पंतप्रधान मोदींनी भूतानमध्ये RUPay कार्ड लॉन्च केले आहे. यामुळे डिजिटल व्यवहारात आणि व्यापारात तसेच पर्यटनात भारताचे संबंध अधिक दृढ होतील.

RUPay ची खासियत –
१. रुपे हे भारतीय कार्ड असून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लॉन्च केले आहे. याचा उद्देश आहे की, देशातील पेमेंट प्रणालीचे एकीकरण व्हावे.
२. SBI सारख्या बँकाशिवाय इतर अनेक बँकांनी रुपे कार्ड जारी केले आहे. जन धन योजने अंतर्गत पाठवण्यात आलेल्या सर्व खात्यांना हेच कार्ड वितरित करण्यात आले आहे.
३. हे कार्ड सर्व भारतीय बँका, एटीएम, पीओएस, टर्मिनल शिवाय ई – कॉमर्स वेबसाइटवर सहज वापरता येते.
४. रुपे कार्डमध्ये देखील हाय अॅण्ड टेक्नोलॉजी चिप इएमवी लावण्यात आले आहे. यात कार्ड धारकांच्या माहितीसाठी मायक्रो प्रोसेसर सर्किट लावण्यात आले आहे.
५. याशिवाय इतर कंपनींच्या कार्डावर असलेले ट्रांजेक्शन शुल्क अधिक असून रुपे वरील शुल्क कमी आहे. याचे प्रोसेसिंग वेगाने होते कारण याचा वापर फक्त भारतात होतो.

आरोग्यविषयक वृत्त –