पंतप्रधान मोदी- शहांची आडवाणी-जोशींची ‘ग्रेट भेट’ घेतले आशीर्वाद

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला बहुमताचा आकडा गाठून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी दोन्ही या जेष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीत मोदी आणि शाह यांनी आडवाणी आणि जोशी यांच्यासमवेत काही वेळ चर्चाही केली.

पंतप्रधान मोदींचे २०१४ साली सरकार आल्यानंतर पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांना बाजूला केलं होतं. या नेत्यात लालकृष्ण आडवाणी आणि जोशी यांचा समावेश होता. यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही जेष्ठ नेत्यांना तिकीटही नाकारण्यात आलं होतं. या कारणामुळे आडवाणी आणि जोशी मोदींवर नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान आडवाणी, जोशी, यशवंत सिन्हा, अरुण शौरी या नेत्यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवलीही होती. परंतु मोदींनी यावर कधीही भाष्य केले नव्हते. परंतु मोदी यांनी या जेष्ठ नेत्यांची भेट घेऊन सर्व चर्चाना विराम दिला आहे. या भेटीनंतर मोदी यांनी ट्विटरद्वारे दोन्ही नेत्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.