काय सांगता ! होय, MBA असणार्‍या सरपंचानं केला गावाचा कायापालट, पंतप्रधान मोदीही झाले फॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  हरियाणा येथील पलवल जिल्ह्यातल्या भिडूकी गावाचं एक चांगलं परिवर्तन करण्यासाठी हा निश्चय मनात धरून एमबीए असणारा सत्यदेव गौतम हे त्या गावाचे सरपंच बनले. सरपंच होताच सत्यदेव गौतम यांनी गावात रेनवॉटर हार्वेस्टिंग (वर्षा जल संग्रहण) सुरु करण्यासाठी मोहिमेत उतरले. सध्या भिडूकी गाव पावसाळ्यामध्ये २५ लाख लीटर इतकं पाणी वाचवतं आहे. या उपक्रमाबद्दल भिडूकी ग्रामपंचायतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’या दरम्यान, कौतुक केलं आहे.

काही वर्षांपूर्वी भिडूकी गावात पावसाळ्यात लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागायचा. गावात पाण्याचा निचरा होत नसल्याने विविध ठिकाणी पाणी साठायचं. विशेषकरुन सरकारी शाळेच्या भागात पाणी साठल्याने पावसाळ्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. तर सत्यदेव गौतम
म्हणाले, पूर्वी ते गुरुग्राममधील एका कंपनीत काम करायचे. त्या भागातही पाणी साठायचं, कंपनीने रेन वॉटर हार्वेस्टिंगने तिथली समस्या सोडवली. पुढे ते म्हणाले, कंपनीतली ती सिस्टीम पाहुनच मला कळालं की, आपल्या गावातल्या समस्येवर हाच उपाय आहे. मात्र टेक्निकली काही गोष्टी स्पष्ट झाल्या नव्हत्या. त्यामुळे पुन्हा कंपनीत जाऊन समजुन घेतल्या आणि त्यानंतर आम्ही शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रारंभ केलं. रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यतिरिक्त इतर अनेक उपक्रम भिडूकी गाव राबवतंय.

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे पाणीटंचाईवर मात केली जाऊ शकते. दरम्यान, ही पद्धत केवळ दुष्काळग्रस्त भागासाठीच नाही तर ज्या भागात पाऊस चांगला आहे तेथेच आवश्यक आहे. कारण जर देशातील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वाचले तर प्रत्येक भागाला याचा लाभ होणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व लक्षात घेऊन हरियाणाच्या ‘भिडूकी ग्रामपंचायतीने’ एक नव्हे तर ४ वेगवेगळ्या ठिकाणी ‘Rainwater harvesting system’ बनवलं आहेत. साधारण १८ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात आता पाणीसाठा करण्याची आवश्यकता पडत नाही किंवा पिण्याच्या पाण्याची समस्या भासत नाही. गावातील उप-आरोग्य केंद्र आणि क्रीडा संकुलातही रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बांधण्यात आले आहेत. तर प्रत्येक यंत्रणेत फिल्टर बसवण्यात आले आहेत जेणेकरून पाणी झिरपण्यात अडचण येऊ नये. यामुळे क्षारयुक्त पाण्याची अडचण संपुन गोडं पाणी मिळत आहे. ४ रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टममुळे भिडूकी गाव प्रतिवर्षी जवळपास २५ लाख लीटर पावसाचं पाणी वाचून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होतेय.

या प्रणालीवरून तेथील शाळेचे मुख्याध्यापक हरिसिंह म्हणतात की, शाळा खूप जुनी आहे. एरवी पेक्षा पावसाळ्यात अडचण वाढते. पावसाळ्यात संपूर्ण शाळा भरायची परंतु, सध्या तसं होत नाही. याने बरीचशी अडचण दुर झाली आहे. ही ग्रामपंचायत गावच्या समस्यांच्या बाबतीत खुप सक्रीय आहे. तर शाळेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवल्यानंतर पाणी साठण्याची समस्या पूर्णपणे संपली. गौतम म्हणाले, या प्रणालीने वर्षभरात ११ लाख लीटरपेक्षा अधिक पावसाचं पाणी साठवलं जातं आहे. त्यामुळे गावातल्या अन्य ठिकाणीही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं आहे. ‘गागावामधील ४० घरांच्या वाल्मिकी वस्तीतील रहिवाशांनी ग्रामपंचायतीकडे आपली समस्या मांडली, पावसामुळे त्यांच्या घरासमोर पाणी भरते. येण्याजाण्यास खूप त्रास होतो असं सांगितलं. म्हणूनच, तिथेही रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बांधली. अशी माहीत गौतम यांनी दिली आहे.

दरम्यान, या प्रणालीमुळे, जलस्त्रोतांची संख्या वाढली आहे. गावातील शेतात, साधारण दर २ किलोमीटर अंतरावर दर २०० ते ३०० मीटर अंतरावर ६ फूट रुंदीचे आणि १० फूट लांबीचे खड्डे तयार केले गेलेत. मेन लाईन खड्ड्यांशी जोडलेली आहे. जेव्हा शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता भासते तेव्हा त्यांना इथुन पाणी घेता येते. ताईच, ‘रेन वॉटर हार्वेस्टिंंगने शहर आणि गावातील पाण्याची समस्या सोडवली जाऊ शकते. पाणी साठवण हा पाणी बचतीचा एक प्रभावी मार्ग आहे. मात्र ,ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवायची गरज आहे. या सिस्टमने आमच्या भिडूकी गावाची भविष्यातली पाणी समस्या सोडवली. असे सरपंच MBA सत्यदेव गौतम यांनी सांगितलं आहे.