मोदींनी मातोश्रीवर फोन करुन मानले आभार

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन 

दमलेल्या सावजाची शिकार करण्याची भाषा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असली, तरी भाजपाकडून आपल्या या जुन्या मित्राची नाराजी दूर करण्याचे, त्यांना गोंजारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे. यावेळी तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ‘मातोश्री’वर फोन करून उद्धव यांचे आभार मानल्याची चर्चा आहे.

राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार हरिवंश सिंह यांना पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी उद्धव ठाकरेंना धन्यवाद दिले.
[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’057b4871-9c67-11e8-974a-97ac232b4c7b’]
राज्यसभा उपाध्यक्षपदाची गुरुवारी निवडणूक झाली. यामध्ये भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवाराला १२५ मते मिळाली होती. एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेही पाठिंबा दिला होता. राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी हरिवंश सिंह यांच्या उमेदवारीला अनुमोदन दिले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गेल्या महिन्यात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावेळी शिवसेना गैरहजर राहिली होती. शिवसेनेच्या या दोन्ही भुमिका विसंगत असल्याने शिवसेनेची नेमकी भूमिका काय याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
केंद्र सरकारमध्ये भाजपचा सर्वांत जुना आणि मोठा सहकारी असूनही उद्धव ठाकरे हे स्वत: तसेच सामना या आपल्या मुख्यपत्रातून भाजपवर निशाणा साधण्याची संधी सोडत नाही. पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळात शिवसेनेला दुय्यम स्थान दिल्याचा दावा शिवसेनेने केला होता. यापुढील निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
[amazon_link asins=’B0794W14FY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f6be6477-9c66-11e8-bdbf-7164f1464b5b’]
या सर्व पार्श्वभूमीवर काल झालेल्या राज्यसभा उपसभापती निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. यानुसार राज्यसभेमध्ये काल शिवसेनेने हरिवंश सिंह यांना पाठिंबा दिला होता. या मदतीचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी मातोश्रीवर फोन केला होता.