PM मोदींनी केलं रावणाच्या 107 फूटी पुतळ्याचे ‘दहन’, स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचे देशवासियांना आवाहन (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दिल्लीच्या द्वारका येथे रावण दहन कार्यक्रमात उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी येथे १०७ फूट रावणाच्या पुतळ्याचे दहन केले. पंतप्रधानांसह दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी आणि पश्चिम दिल्लीचे खासदार प्रवेश वर्मा यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते. रावण दहन होण्यापूर्वी पीएम मोदी यांनी कार्यक्रमात उपस्थित लोकांना संबोधित केले.

पंतप्रधान मोदींनी जय श्री राम असे म्हणत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, भारतात ३६५ दिवसांपैकी क्वचितच असा एखादा दिवस आढळेल ज्या दिवशी कोणताच उत्सव साजरा केला जात नाही. उत्सव आपल्या सर्वांना एकमेकांशी जोडतात आणि आपल्या आयुष्यात आनंद भरतात. त्यामुळे आमच्या नसानसांमध्ये उस्फूर्तता भरलेली असते.

पीएम मोदी म्हणाले की, आपल्या देशातील उत्सव शिक्षण आणि सामूहिक जीवनाचे प्रशिक्षण देतात. कला, साधनेमुळे उत्सवांमध्ये जिवंतपणा कायम राहतो. त्यामुळे आपल्याकडे रोबोट नव्हे तर मनुष्य जन्माला येतात. मोदी म्हणाले की शक्तीची साधना, पूजा आणि आराधनेचा सण म्हणजे नवरात्रीचा उत्सव होय. नवरात्र म्हणजे आंतरिक शक्ती जमा करणे आणि अशक्तपणा दूर करण्याची साधना आहे. प्रत्येक आई-मुलीचा सन्मान, अभिमान आणि सन्मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे अशी भावना हा सण सर्वांमध्ये रुजवतो.

ते म्हणाले की आम्ही भारतवासी आव्हान देवून वेळेनुसार स्वतःमध्ये योग्य बदल करणारे आहोत. आम्ही स्वतःच वाईटाच्या विरोधात उभे आहोत. संत नेहमीच वाईट गोष्टीविरूद्ध उभे असतात.

स्त्रियांचा गौरव हेच लक्ष्मीपूजन :
या दिवाळीनिमित्त आपण ज्या मुलींनी आयुष्यात काही साध्य केले आहे, ज्या मुली इतरांना प्रेरणा देऊ शकतात अशा मुलींचा सन्मान केला पाहिजे. या दिवाळीला आपले लक्ष्मीपूजन असेच साजरे झाले पाहिजे. ते म्हणाले की, आज विजयादशमीचा सण आहे आणि त्यासोबतच आपल्या हवाई दलाचा वर्धापन दिन आहे. आपल्या देशातील हवाई दल ज्या पद्धतीने नवीन उंची गाठत आहे, त्या आपल्या हवाई दलातील शूर सैनिकांची आठवण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलीलापासून दूर दिल्लीच्या द्वारका सेक्टर १० मध्ये प्रथमच रामलीला उत्सवात सामील होत आहेत. पीएम मोदी यांच्या आगमनामुळे परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाची माहिती पोलिसांना ५ दिवसांपूर्वी देण्यात आली होती.

त्यानंतर सुरक्षा यंत्रणेची तयारी फार पूर्वीपासून सुरू झाली होती. रामलीलाच्या व्यासपीठावरून, जिथून पंतप्रधान मोदी रावणावर धनुष्य बाण सोडणार होते त्या ठिकाणाला राम मंदिराचे रूप देण्यात आले आहे. स्टेजच्या आसपासची जागा एसपीजीने हाती घेतली आहे. गेल्या वर्षी लाल किल्ल्याच्या दसरा महोत्सवात झालेल्या लव-कुश रामलीला कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदींनी भाग घेतला होता. यावेळी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे पुतळेही जाळण्यात आले.

Visit : Policenama.com