मुंबईसह 3 नव्या हायटेक लॅबचे उद्घाटन ! ‘कोरोना’सोबत लढणार आणि जिंकणार, टेस्टिंगची पूर्ण व्यवस्था : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोएडा, कोलकाता आणि मुंबईतील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या तीन नव्या लॅबचे उद्घाटन केले. पीएम मोदी यांनी म्हटले की, आज देशातील करोडो नागरिक कोरोना व्हायरसविरूद्ध वेगाने लढत आहेत. आज ज्या हायटेक लॅबचे उद्घाटन झाले आहे, त्याचा महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशला कोरोनाविरूद्ध लढाई लढण्यासाठी जास्त फायदा होणार आहे.

पीएम मोदी यांनी पुढे म्हटले की, दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि कोलकाता ही शहरे आर्थिक दृष्टीने खुप महत्वपूर्ण आहेत. येथे देशातील लाखो तरूण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. अशावेळी देशात सध्याच्या टेस्टच्या क्षमतेत 10000 ची वाढ होईल. आता या शहरांमध्ये आणखी वेगाने टेस्ट होतील. या लॅब केवळ कोरोना टेस्टींगसाठीच मर्यादीत राहणार नाहीत, तर भविष्यात एचआयव्ही, डेंग्यूसह अन्य गंभीर आजारांच्या चाचण्यासुद्धा करतील.

पीएम मोदी यांनी म्हटले की, आपल्या देशात योग्यवेळी निर्णय घेतले गेल्याने भारतात अन्य देशांच्या तुलनेत स्थिती ठिक आहे. आज आपल्या देशात कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंचा दर अनेक मोठ्या देशांच्या तुलनेत खुप कमी आहे. सोबतच आपल्याकडे रिकव्हरी रेटसुद्धा खुप चांगला आहे.

पीएम मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, येत्या काळात अनेक सण येणार आहेत. या दरम्यान आपल्याला खुप सावध राहावे लागेल. या सोबतच गरीबांना धान्य मिळण्याची व्यवस्थाही केली पाहिजे. जोपर्यंत कोरोनावर उपचार मिळत नाही तोपर्यंत आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करावा लागेल.

पीएम मोदी म्हणाले, आपल्या देशात सुमारे 10 लाख लोक बरे झाले आहेत. कोरोनाच्या लढाईत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे खुप आवश्यक होते, यासाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटी रुपयांची पहिली घोषणा केली होती. भारताने आयसोलेशन, टेस्टींगपासून नेटवर्क स्थापन करण्यापर्यंत खुप वेगाने काम केले.

पीएम मोदी म्हणाले, संपूर्ण देशात आज 1300 पेक्षा जास्त लॅब आहेत. आज भारतात पाच लाखांपेक्षा जास्त टेस्ट रोज होत आहेत. येत्या काही आठवड्यात त्या 10 लाख प्रतिदिन करण्याचा प्रयत्न आहे. या महामारी दरम्यान सर्वजण भारतीयांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहे. भारताने जे केले ती एक यशस्वी कहानी आहे.

त्यांनी म्हटले की, एक काळ होता की भारतात पीपीई किट तयार होत नव्हते. परंतु, सहा महिन्यात भारत जगातील दुसरा मोठा पीपीई किट उत्पादक देश बनला आहे. आपल्या येथे प्रत्येक दिवशी दररोज पाच लाखांपेक्षा जास्त पीपीई किट बनत आहेत. आज भारतात तीन लाखांपेक्षा जास्त एन -95 मास्क रोज तयार होत आहेत. अगोदर आपण दुसर्‍या देशांकडून मागत होतो.

यापूर्वी भारत व्हेंटिलेटर दुसर्‍या देशांकडून मागवत होता. परंतु, आज आपण एका वर्षात तीन लाख व्हेंटिलेटर बनवू शकतो. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे लोकांचे जीवन वाचवले जात आहे. सोबतच आयात होणार्‍या वस्तूंची निर्यात करू शकत आहोत.

लॅब उद्घाटनाच्या दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्द्धन आणि आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्यासह तीन राज्यांचे मुख्यमंत्री – युपीचे सीएम योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी सुद्धा उपस्थित होत्या.

दरमयान, कोरोना टेस्टींग वाढल्याने खुप जास्त केस समोर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा रविवारी मन की बात कार्यक्रमात म्हटले होते की, कोरोना व्हायरसचा धोका टळलेला नाही आणि अजूनही तो तितकाच घातक आहे, जेवढा सुरूवातीच्या दिवसात होता. अशावेळी कोरोना टेस्टींगच्या नव्या लॅब आल्याने जास्तीत जास्त लोकांची टेस्ट होणार आहे.