PM नरेंद्र मोदींनी दिल्या CM उध्दव ठाकरेंना ‘या’ शुभेच्छा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याला आज नवे मुख्यमंत्री मिळाले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता ‘मोठ्या भावा’ने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ट्वीट करत शुभेच्छा कळवल्या.
PM Modi

पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत ट्विट केले आहे की महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा. मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न करतील.

दिल्लीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठ्या भावाच्या मिळाल्या शुभेच्छा
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदासाठी महाविकासआघाडीकडून घोषणा झाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले होते की आता सरकार स्थापन झाल्यावर मी दिल्लीला मोठ्या भावाची भेट घ्यायला जाणार आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा पाठवल्या. सकाळी देखील पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन झाला होता. आता पाहावे लागेल की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरंच मोठ्या भावाची भेट घ्यायला दिल्लीला जाणार का ?

Visit : Policenama.com