Coronavirus Lockdown : PM नरेंद्र मोदींच्या लॉकडाऊनच्या भाषणानं तोडले ‘ते’ सर्व ‘रेकॉर्ड’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यांच्या भाषणाकडे प्रत्येक भारतीय डोळे लावून बसले होते. आतापर्यंत मोदींच्या सर्व भाषणांपैकी लॉकडाऊनच्या भाषणाने रेकॉर्ड तोडल्याची माहिती उघड झाली आहे. बार्क इंडिया रेटिंग्जने ही माहिती दिली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मंगळवारी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. यापूर्वी मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. टिव्ही रेटिंग एजन्सी ब्रॉडकास्टिंग ऑडियंस रिसर्च काउन्सिल (बीएआरसी) च्या रेटिंगनुसार मोदींचे लॉकडाऊनचे भाषण त्यांच्या जनता कर्फ्यू आणि नोटाबंदीसह मागील सर्व भाषणांपेक्षा प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी ट्वीट केले आहे.

बार्क इंडियाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 24 मार्च रोजी लॉकडाऊनसंदर्भात केलेले भाषण टिव्हीवर सर्वाधिक पाहिले गेले आहे. त्याच्या तुलनेत आयपीएलचा अंतिम सामना पाहणार्‍यांची संख्याही मागे पडली आहे. हे भाषण सुमारे 201 चॅनलवर दाखविण्यात आले. आयपीएलची अंतिम मॅच 13.3 कोटी जनतेने पाहिली होती. तर पंतप्रधान मोदींचे लॉकडाऊनचे भाषण 19.7 कोटी लोकांनी पाहिले आहे. पंतप्रधानांचे 19 मार्चचे जनता कर्फ्यूचे भाषण 191 टिव्ही चॅनेल्सवर दाखविण्यात आले होते, ते 8.30 कोटी लोकांनी पाहिले होते. मागील वर्षी ऑगस्टमध्ये जेव्हा पंतप्रधानांनी घटनेच्या कलम 370 रद्द करण्याबाबत भाषण केले होते. तेव्हा ते 163 वाहिन्यांवरुन 6.5 कोटी जनतेने पाहिले होते. तर 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा 114 वाहिन्यांवरुन 5.7 कोटी लोकांनी भाषण पाहिले होते.