जन्म दिवसानिमित्त PM मोदी सरदार सरोवरावर दाखल, असा असेल ‘दिनक्रम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दरवर्षीप्रमाणे यंदाही नरेंद्र मोदी आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करणार आहेत. आज पंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस आहे. सकाळीच मोदींनी सरदार सरोवराला भेट दिली. त्यानंतर ते नर्मदेची आरतीही करणार आहेत. मातोश्री हिराबेन यांचे आशीर्वाद घेऊन पुढील दिनक्रमासाठी नरेंद्र मोदी प्रस्थान करणार आहेत.

असा असेल आजचा मोदींचा दिनक्रम –

पंतप्रधान मोदी सर्वात आधी आपली आई हीराबेन यांची भेट घेतील.
त्यानंतर नर्मदा जिल्ह्यात होणाऱ्या पूजेमध्ये ते सहभागी होतील.
येथील एका जनसभेला मोदी संबोधितही करणार आहेत.
सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेदरम्यान ही सभा होण्याची शक्यता आहे.

मोदींच्या स्वागतासाठी गुजरात सज्ज –
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त संबंध गुजरात सज्ज झाला आहे. सरदार सरोवरावर तिरंगी झेंड्यांची लायटिंग करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त भाजपकडूनही मोदींच्या जन्मदिनानिमित्त जंगी तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे दिल्लीसह अनेक ठिकाणी मोदींच्या जन्म दिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.