India Energy Forum मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले – ‘क्लीन एनर्जीमध्ये गुंतवणूक करायला भारताने यायला हवे’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंडिया एनर्जी फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताचे एनर्जी फ्यूचर अतिशय नेत्रदीपक होणार आहे. भारत यावर वेगाने काम करत आहे. येत्या काही वर्षांत भारतातील उर्जेचा वापर दुप्पट होईल. ते म्हणाले की, भारतीय बाजाराकडे कोणी दुर्लक्ष करू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील गुंतवणूकदारांना क्लीन एनर्जीमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूकीसाठी भारत जगातील सर्वोत्तम पर्याय म्हणून उदयास आला आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या कार्यक्रमास सामील झाले. याशिवाय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. प्रमुख तेल व वायू कंपन्यांचे सुमारे 45 मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीस उपस्थित राहिले आहेत. पीएम मोदी म्हणाले की, जगभरातील बड्या तेल कंपन्यांना ऊर्जा क्षेत्राबाबत विचारमंथन करण्याची आवश्यकता आहे. यात सहकार्यासाठी भारत सदैव तत्पर आहे.

पंतप्रधान म्हणाले की, ऊर्जा कॉरिडोर तयार करण्याची योजना आहे. भारत तिसरा मोठा देश आहे, जेथे देशांतर्गत स्तरावर सर्वाधिक ऊर्जा वापरली जाते. जागतिक तेल आणि वायू क्षेत्रातील भारत एक महत्त्वाचा देश आहे. क्रूड तेल तिसर्‍या क्रमांकाचा ग्राहक आहे. भारताच्या जागतिक तेल आणि वायू मूल्य शृंखलामध्ये सक्रिय सहभागी होण्याच्या उद्देशाने, निती आयोगने 2016 मध्ये सर्वप्रथम जागतिक तेल आणि वायू कंपन्यांच्या सीईओंची गोलमेज बैठक आयोजित केली.

हा वार्षिक कार्यक्रम निती आयोग आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने आयोजित केला होता. पीएमओने निवेदनात म्हटले आहे की, नितीन आयोग आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचा हा 5 वा कार्यक्रम आहे. या गोलमेज बैठकीला प्रमुख तेल आणि वायू कंपन्यांच्या सुमारे 45 मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

You might also like