महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रसंघानं केलं डाक तिकिटाचं अनावरण, भारतानं दिलं ‘हे’ गिफ्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील अनेक राष्ट्राध्यक्षांनी आज सकाळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित  संयुक्त राष्ट्रसंघाकडून पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघात आयोजित करण्यात आलेल्या ‘समकालीन कालखंडातील महात्मा गांधी’ या कार्यक्रमात या तिकिटाचे अनावरण करण्यात आले.

त्याचदरम्यान  भारताने देखील संयुक्त राष्ट्रसंघाला यावेळी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त सोलर प्लांट बक्षीस म्हणून दिला. या कार्यक्रमाला बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटारेज, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती  मून-ज-इन तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत या सोलर प्लॅन्टचे देखील अनावरण करण्यात आले. यामध्ये 193 सोलर पॅनल लावण्यात आले असून याद्वारे जवळपास 50 किलोवॅट विजेची निर्मिती केली जाणार आहे.

दरम्यान, 2 ऑक्टोबर रोजी  संपूर्ण भारतासह जगातील विविध देशांमध्ये महात्मा गांधी  यांची 150 वी जयंती साजरी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाने या तिकिटाचे अनावरण केलं आहे.
Visit : policenama.com