पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास ; शहरापासून गावापर्यंत विकास होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसीचा दौरा केला. सकाळी साडेदहा वाजता ते वाराणसीमधील लाल बहादुर शास्त्री अंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यावेळी विमानतळावर राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, भाजप प्रदेश अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पाण्डे यांच्यासह अनेक नेते पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी यावेळी विमानतळावर हजर होते. स्वागत समारंभानंतर मोदींनी विमानतळावरील लाल बहादुर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी लाल बहादुर शास्त्री यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच अनिल शास्त्री आणि भाजप नेता सुनील शास्त्री यांनी मोदींचे स्वागत केले. त्यानंतर मोदींनी जवळच असणाऱ्या एका प्राथमिक विद्यालयात वृक्षरीपण केले.

यावेळी मोदींनी पिंपळाचे एक झाड लावले आणि त्यांच्या हस्ते झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी काल संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना म्हटले कि, संपूर्ण देशभरात ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होणार असल्याचे वातावरण असतानाकाही भारतीय आपल्या क्षमतांवर शंका घेत आहेत. मी देशवासियांना सांगू इच्छितो कि, न्यू इंडिया या संकल्पनेला य अर्थसंकल्पामुळे नवे पंख मिळाले असून ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करणे हे सध्या आमचे ध्येय आहे. पुढे चालत राहणे हे आमचे ध्येय आहे. चांगल्या उत्पन्नामुळे तुमच्या आयुष्यात बदल होईल. यावेळी त्यांनी इंग्रजीमधील एक म्हण सांगत नागरिकांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर जोर देत विरोधकांवर देखील टीका केली. ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था कशाप्रकारे उभी करू शकतो यावर बोलताना ते म्हणाले कि, कोणत्याही देशात प्रति व्यक्ती उत्पन्न वाढले कि, त्याची खरेदी करण्याची क्षमता देखील वाढते. खरेदीची क्षमता वादळी कि मागणी वाढते. मागणी वाढल्यास उत्पादन वाढते. त्यामुळे सेवा विस्तारते आणि रोजगारांमध्ये देखील वाढ होते. त्यामुळे याचा सरळ प्रभाव हा अर्थव्यवस्थेवर पडून ती वाढीस लागते.

दरम्यान, त्यांनी यावेळी भाषणात कालच्या अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात भाष्य करत नागरिकांना एका प्रकारे या अर्थसंकल्पाचा फायदा आणि हा अर्थसंकल्प समजावून सांगितला.

सिनेजगत बातम्या

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री