पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना सेऊल शांतता पुरस्काराने स्नमानीत करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मागील वर्षात ऑक्टोबर महिन्यात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आले असता मोदींना आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोदीनॉमिक्स आणि लोकशाहीला बळकटी दिल्याने हा पुरस्कार देण्यात आला आहे.

पुरस्कारासह नरेंद्र मोदींना १ कोटी ३० लाखांची रक्कम देण्यात आली आहे. पुरस्कारासह मिळालेली रक्कम नमामि गंगा योजनेला देणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं आहे. वैश्विक शांततेसाठी केलेल्या कार्यासाठी नरेंद्र मोदींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

आज कट्टरता आणि दहशतवाद जगासाठी समस्या बनली आहे. दहशतवादाला समुळ नष्ठ करण्यासाठी हात मिळवत एकजूट होण्याची वेळ आली आहे. फक्त असं केल्याने आपण द्वेष प्रेमात बदलू शकतो, असं मोदींनी पुरस्कार स्विकारताना आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून भारतातील लोकांचा आहे. मागील ५ वर्षात मोठे यश गाठले आहे. १.४ बिलियान लोकांच्या पाठिंब्यामुळे हे साध्य झाले आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.