…म्हणून PM मोदींनी ख्रिश्चन परिचारिकेकडून घेतली लस – प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज हिंदू निष्ठेचे ढोल बडवतात. पण हिंदू परिचारिकांवर त्यांचा विश्वास नाही, म्हणून ख्रिश्चन परिचारिकेकडून त्यांनी लस घेतली, काय वागण आहे, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.

देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून (दि.1) प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान मोदीनी लसीचा पहिला डोस आज सकाळी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला. याबाबत मोदींनीच ट्विटरवरुन फोटो पोस्ट केल्यानंतर त्याची माहिती सर्वासमोर आली. या फोटोमध्ये मोदींसोबत दोन नर्सही दिसत आहेत. तर, लस घेताना मोदी हसत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. मोदींनी लस घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.

मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचे नाव पी. निवेदिता असून त्या मूळच्या पुद्दुचेरीच्या आहेत. तसेच दुसऱ्या परिचारिकेचे नाव रोसामा अनिल असून त्या केरळच्या आहेत. दोन्ही परिचारिकांनी मोदीना दिलेल्या लसीसंदर्भात माहिती दिली आहे. यावेळी मोदीनी काय विचारल असा प्रश्न या परिचारिकांना विचारला असता त्यावर त्या म्हणाल्या की, तुम्ही मुळच्या कुठून आहात, वैगेरे चौकशी पंतप्रधानानी केली. तसेच कोरोनाची लस दिल्यानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया देताना, दिली सुद्धा लस कळलही नाही, अस म्हटले अशी माहिती पी. निवेदिता यांनी दिली.