पंतप्रधान मोदीही या समस्येने आहेत त्रस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

आपण फोन लावला तर समोरच्याला ऐकायला येत नाही. किंवा समोरच्याचे म्हणणे ऐकायला येत नसणे, बोलणे सुरु असताना फोन कट होणे अशा समस्या आता आपण सरसावलो आहे. पण आता लोकांनी त्यावरुन चीड चीड करायची काही एक गरज नाही. ही समस्या केवळ तुमच्या एकट्याची नाही यावर समाधान माना. कारण आपल्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कॉल ड्रॉपच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. त्यांनी नुकताच दिल्ली विमानतळ ते आपल्या कार्यालयापर्यंतचा प्रवास केला. तसेच मेट्रोमधूनही प्रवास केला होता.  त्यावेळी त्यांना फोन करताना कशा प्रकारच्या अडचणी आल्या हे त्यांनी टेलिकॉम विभागाला सांगून यावर तांत्रिक उपाय शोधण्याची सूचना केली आहे. तसेच मोबाइल आॅपरेटर्स ग्राहकांना योग्य सुविधा पुरवत असल्याकडेही लक्ष देण्यास सांगितले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’76952021-c21b-11e8-8f40-4d820e4a3d70′]

पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला सचिवांसोबत चर्चा करतात. यावेळी टेलिकॉम सचिव अरुणा सुंदराजन यांनी ग्राहकांकडून येत असलेल्या तक्रारींबद्दल सांगितले. यामध्ये कॉल ड्रॉपचाही समावेश होता. दिल्ली विमानतळावर पोहोचताच लोकांना कशाप्रकारे कॉल ड्रॉपच्या समस्येचा सामना करावा लागतो,  यासंबंधी नरेंद मोदी यांनी आपला स्वत:चा अनुभव सांगितला. तसेच कॉल ड्रॉप ही संपूर्ण देशभरातील समस्या झाली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

पती हा पत्नीचा मालक नाही :  सुप्रीम कोर्ट

मोबाइल ग्राहकांना सामोरे जावे लागत असणाऱ्या समस्येवर तातडीने उपाय शोधण्याची गरज असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी नरेद्र मोदींनी टेलिकॉम सेक्रेटरींना कॉल ड्रॉपमुळे आतापर्यंत टेलिकॉम आॅपरेटर्सकडून किती दंड गोळा करण्यात आल्यासंबंधी माहिती विचारली. यावेळी सुंदराजन यांनी सांगितलं की, तीन कॉल ड्रॉपमागे एक रुपया दंड आकारण्याचा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही. टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने क्वालिटी आॅफ सर्व्हिस प्रस्ताव आणला होता ज्यामध्ये खराब नेटवर्कसाठी जास्त दंड आकरण्याचा प्रस्ताव होता. कारवाईविरोधात मोबाइल आॅपरेटर दंड ठोठावण्याचा प्रयत्न करत आहेत. जिथपर्यंत मोबाइल आॅपरेटरर्सकडून दंड वसूल केल्याचा प्रश्न आहे, मंत्रालय ती माहिती देऊ शकलेले नाही.

पंतप्रधानांनी टेलिकॉम सेक्टरमधील समस्या सोडवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे असे सांगितले आहे. यासंबंधी पीएमओकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. यावेळी मोदींनी टेलिकॉम विभागाला सीमारेषेवरील नेटवर्कच्या समस्येवर उपाय काढण्याचीही सूचना केली आहे जेणेकरुन शत्रू भारत विरोधी अजेंडा राबवण्यात यशस्वी होणार नाहीत.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b70b32f7-c21b-11e8-b353-1bb3c7ac1ab9′]