Ghulam Nabi Azad farewell : राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांचा उल्लेख करून भावनिक झाले PM मोदी, सभागृहात केला ‘सॅल्यूट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांच्या निरोपावेळी भावनिक झाले. राज्यसभा खासदार म्हणून गुलाम नबी आझाद यांचा आज शेवटचा दिवस होता. या दरम्यान पीएम मोदी म्हणाले, गुलाम नबी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्ही मी सुद्धा एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. आमची खुप जवळचे संबंध होते. एकदा गुजरातच्या काही पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, यामध्ये 8 लोक मारले गेले. सर्वप्रथम मला गुलाम नबी यांचा फोन आला. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. याच घटनेचा उल्लेख करताना पीएम भावनिक झाले.

त्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत पीएम म्हणाले, परंतु गुलाम नबी त्या रात्री एयरपोर्टवर होते, त्यांनी मला फोन केला आणि जशी आपल्या कुटुंबातील सदस्याची चिंता असावी अशाप्रकारे ते चिंता करत होते. त्यावेळी प्रणव मुखर्जी संरक्षण मंत्री होते. मी त्यांना म्हटले की, जर मृतदेह आणण्यासाठी लष्कराचे विमान मिळाले तर बरे होईल, यावर ते म्हणाले की, चिंता करू नका मी करतो व्यवस्था.

पंतप्रधानांनी म्हटले, गुलाम नबी आझाद, शमशेर सिंह, मीर मोहम्मद फैयाज, नादिर अहमद, मी तुम्हा चौघा महान व्यक्तींना सभागृहाची शोभा वाढवण्यासाठी, तुमचा अनुभव, तुमचे ज्ञान सभागृह आणि देशाच्या लाभासाठी दिल्याबद्दल आणि मतदार संघाच्या समस्या सोडवण्यासाठी योगदान दिल्याबद्दल धन्यवाद देतो.

देश आणि पक्ष, दोन्हीची करत होते चिंता – पीएम
पीएमने म्हटले की, मला चिंता या गोष्टीची आहे की नबी यांच्यानंतर जो हे पद सांभाळेल, त्यांना गुलाम नबी यांच्याशी मॅच करण्यात खुप अडचण येईल. कारण गुलाम नबीजी आपल्या पक्षाची चिंता करत होते, परंतु देश आणि सभागृहाची सुद्धा तेवढीच चिंता करत होते.

राज्यसभेत पीएम म्हणाले, मी माझा अनुभव आणि स्थितीच्या आधारावर गुलाम नबी आझाद यांचा सन्मान करतो. मला विश्वास आहे की, राष्ट्रासाठी काम करण्याचे त्यांचे अभियान नेहमी सुरूच राहील.