खुशखबर ! शेतकऱ्यांना आता मिळणार ३००० रुपये पेन्शन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १५ ऑगस्ट ला खास शेतकऱ्यांसाठी नवीन ‘किसान पेंशन योजना’ सुरु करण्याची घोषणा करू शकतात. कृषि सचिवांनी राज्यांना पत्र लिहून ही योजना लागू करण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या योजनेचा फायदा जवळपास १२-१३ कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात ५ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल.

काय आहे योजना
१८ ते ४० वर्ष वयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार असून त्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर या लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक ३००० रुपये इतकी पेन्शन मिळेल. पहिल्या टप्प्यात ५ केवळ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून नंतर हळूहळू याची व्याप्ती वाढून १२-१३ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल. या योजनेनुसार १८ वर्षांसाठी शेतकऱ्यांना प्रतिमहिना १०० रुपये इतकी रक्कम भरावी लागेल. एवढीच रक्कम सरकारतर्फे देखील शेतकऱ्यांसाठी भरली जाईल.

यादरम्यान जे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला ५० टक्के रक्कम मिळत राहील. या योजनेवर सरकार १० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. LIC शेतकऱ्यांच्या पेन्शन फंड चे व्यवस्थापन करणार असून पुढील आठवड्यात याच्या रजिस्ट्रेशन ची सुरुवात होऊ शकेल.

कुठून सुचली योजनेची कल्पना
मिळालेल्या माहितीनुसार भाजपने आणि केंद्र सरकारला ही कल्पना हरियाणा राज्यातील एका योजनेवरून सुचली आहे. भाजप शासित हरियाणा राज्यात तेथील भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांच्या नेतृत्वात एक कमिटी बनवली गेली होती. या कमिटीने खूप अभ्यास करून शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा सल्ला दिला आणि तयासाठी १५०० कोटी रुपये खर्च करण्याची योजना सांगितली. ही पेन्शन ५ एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना दिली गेली जाणार आहे तर त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा मासिक १५ हजार पेक्षा कमी असावी असे निश्चित केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त