मोदी हिटलरच्या वाटेवर देश नेऊ पहात आहेत : राज ठाकरे

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाइन – देशाला स्वप्न दाखवून पंतप्रधान मोदी खोट बोलत असल्याचा आरोप करत त्यांनी पतंप्रधान झाल्यापासून ते आजपर्य़ंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. कारण ते पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात असा आरोप राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे यांनी इचलकरंजीतल्या सभेत हा आरोप केला.

नेहरु देशाचे पंतप्रधान होते तेव्हापासून पत्रकार परिषद घेण्याची पद्धत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापार्यत एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही किवा बोलावली नाही. फक्त प्रसारमाध्यमाची मुस्कटदाबी करणे एवढं यांना माहीत आहे, अशी टीका त्यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हायला हवेत. शत्रू राष्ट्राचा पंतप्रधान हा आपल्या देशात कोण निवडून यावा हे का बोलतो ? काय कटकारस्थान आहे या मागे याचा शोध लागला पाहिजे असेही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे या देशावरचे कलंक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरच्या वाटेवर देश नेऊ पहात आहेत. हिटलरनेही हीच नीती वापरली होती. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनाही देशात हुकूमशाहीच आणायची आहे अशीही टीका राज ठाकरेंनी केली. देशात अस्थिरता निर्माण करायची, धर्माच्या नावावर लोकांमध्ये भांडणं लावायची आणि आपला राजकीय स्वार्थ साधायचा हे या सरकारचं धोरण आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

You might also like