‘RuPay’ कार्डधारकांसाठी खुशखबर ! आता दुबईत कार्डद्वारे ‘व्यवहार’ केल्यास कुठलाही चार्ज नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदी सध्या संयुक्त अरब अमीरात (UAE) च्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात UAE मधील बाजार RuPay चे कॉर्ड लॉन्च करण्यात आले. यामुळे डिजिटल व्यवहार आणि व्यापारात तसेच पर्यटनात भारताचे संबंध वाढतील. येथील अनेक दुकानात आणि व्यवसायिकांकडे डिजीटल व्यवहारासाठी हे कार्ड वापरण्यात येईल. संयुक्त अरब अमीरात पश्चिम अशियातील पहिला देश असेल. जे इलेक्ट्रिक व्यवहारांना इंडियन टेक्नॉलॉजी वापरत आहे. भारताने या आधी सिंगापूर आणि भूतानमध्ये रुपे कार्ड लॉन्च केले आहे.

पीएम मोदींनी येथे रुपे कार्डच्या माध्यमातून खरेदी करुन बाजारात हे कार्ड लॉन्च केले. पंतप्रधान मोदींनी 2014 ला कॅशलेस इकोनॉमीला प्रोस्ताहन देण्यासाठी देशात RuPay कार्ड लॉन्च केले होते.

UAE तील कंपन्याने दिले आश्वासन –
UAE मध्ये उद्योग करणाऱ्या लुलु समूह, पेट्रोकेम मिडल ईस्ट, एनएमसी हेल्थकेअर आणि लँडमार्कसह 21 प्रमुख उद्योग समूहांनी रुपे कार्डाचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. UAE आणि भारताने तांत्रिकदृष्ट्या इंटरफेस तयार करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.

दुबईमधील लोकांना मिळणार फायदा –
दरवर्षी यूएईमध्ये जवळपास 30 लाख भारतीय पर्यटक फिरण्यासाठी येतात. या कार्डच्या लॉन्चिंगमुळे 1,75,000 ठिकाणांवर कार्ड वापरता येईल. तसेच 5 हजार एटीएममधून रोख रक्कम काढता येईल. विशेष म्हणजे त्यावर वापरकर्त्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. त्यामुळे त्यांचा यावर होणारा खर्च वाचेल.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like