केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार, शिवसेनेसह ‘या’ पक्षांना मिळणार संधी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन सहा महिन्यांचा कालावधी होत आला असून आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आणखी काही मित्रपक्षांना देखील जागा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या जेडीयूकडे केंद्रात एकही मंत्रिपद नसून त्यांच्या काही मंत्र्यांच्या समावेशाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच शिवसेनेला देखील एकच मंत्रिपद मिळाले आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून या निमित्ताने पंतप्रधान मोदी आपल्या मंत्र्यांच्या कामांचा देखील आढावा घेणार आहेत. डिसेंबर महिन्यात हे अधिवेशन होणार असून त्याआधी विस्तार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याआधी सरकरने प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली केली असून यामध्ये 11 सचिव आणि 12 ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अध्यक्षपदी आयएएस अधिकारी ब्रज राज शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसांमध्ये प्रशासनात मोठे बदल करण्यात येणार असून नरेंद्र मोदी संपूर्ण नवीन टीमची निवड करणार आहेत.

दरम्यान, सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला केवळ 1 जागा दिल्याने या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना जागा मिळते कि नाही हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

 

Visit : Policenama.com