CAA बद्दल ‘अफवा’ पसरवून तरूणांची दिशाभूल केली जातेय : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लागू केल्यापासून देशात अनेक वादांना तोंड फुटले. या कायद्यविरोधात अनेक लोकांनी निदर्शने केली. विद्यार्थ्यांनी देखील या कायद्याविरोधात रान पेटवले आणि आंदोलने छेडली. देशातील झालेल्या या आंदोलनांना हिंसक वळण प्राप्त झाले आणि त्यातून देशातील वातावरण हे कमालीचे तापले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सविस्तर असे भाष्य केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत तरुणाईच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ते म्हणाले मी देशभरातील तरुणांना सांगू इच्छितो की, देशाचे नागरिकत्व देण्यासाठी सरकारने रातोरात कुठलाही कायदा बनवलेला नसून या कायद्यानुसार कुणाचेही नागरिकत्व रद्द करण्यात येणार नसून हा कायदा नागरिकत्व प्रदान करणारा कायदा आहे असे नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले.

आज मोदी यांनी कोलकाताजवळील बेलूर मठाला भेट दिली आणि स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली. या दरम्यान नरेंद्र मोदींनी उपस्थित युवा वर्गाला संबोधित केले. मोदी म्हणाले की, ”नारगिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशातील तरुणाईच्या मनात प्रश्न अनेक निर्माण झालेले आहे अशा तरुणांना मी संगी इच्छितो की देशाचे नागरिकत्व देण्यासाठी सरकारने रातोरात कुठलाही कायदा बनवलेला नाही. नागरिकत्व कायदा हा कुणाचेही नागरिकत्व काढून घेणारा नाही तर नागरिकत्व देणारा आहे. देशाची फाळणी झाल्यानंतर भारतातील मुसलमानांवर पाकिस्तानने छळ केला तेव्हा अशा नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात यावे, असे महात्मा गांधी आणि इतर काई ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे होते. तर या कायद्याच्या माध्यमातून याची पूर्तता करण्यात आली आहे. आता आपल्या देशात शरणागत म्हणून आलेल्यांना पुन्हा मृत्यूच्या छायेत ढकलायचे का?” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

तसेच नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले की “जर कुठल्याही धर्माची एखादी व्यक्ती असेल मग तिचा देवावर विश्वास असेल किंवा नसेल परंतु त्या व्यक्तीला भारताच्या घटनेवर विश्वास असेल, तर ती व्यक्ती योग्य प्रक्रियेद्वारे भारताचे नागरिकत्व मिळवू शकते,” असे म्हटले. तसेच यावेळी मोदींनी पूर्वोत्तर भारतावर या कायद्यामुळे होणाऱ्या परिणामावर भाष्य केले. ते म्हणाले पूर्वोत्तर भारतातील संस्कृती आणि परंपरेबाबत आम्हाला अभिमान आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे पूर्वोत्तर भारताच्या संस्कृती आणि परंपरांवर कोणताही परिणाम होणार नसून यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/