PM नरेंद्र मोदी गंगा घाटावर अडखळून पडले ! (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कानपूर दौऱ्यावर आहेत. आज मोदींनी गंगा घाटाला भेट दिली. यावेळी चालत असताना मोदींचा अचानक तोल गेला आणि ते अडखळून पडले. मोदींचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, नरेंद्र मोदी गंगा घाटावरील पायऱ्या चढत आहेत आणि अचानक त्यांचा तोल जातो आणि ते अडखळून पडतात.

पंतप्रधान नरेंद्री यांनी आज उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत नमामी गंगे प्रकल्पाची समीक्षा केली. यावेळी योगींसह मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही उपस्थित होते. आज योगी आणि इतर मंत्र्यांसह मोदींनी कानपूर दौरा केला. नरेंद्र मोदी गंगा किनारी असणाऱ्या अटल घाटावरील पायऱ्यांवरून जात होते. यावेळी पायऱ्यांवरून चालताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते अडखळून पडले. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते पडताच त्यांना इतर उपस्थित सुरक्षा रक्षकांनी सावरलं.

मोदींचा हा व्हिडीओ एका व्यक्तीनं ट्विटरवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like