Prime Minister Narendra Modi To Arrive In Dehu | पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जून महिन्यात ‘या’ तारखेला देहूनगरीत आगमन होणार

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – Prime Minister Narendra Modi To Arrive In Dehu | पुण्यातील श्रीक्षेत्र देहूनगरीतील (Shrikshetra Dehu) संत तुकाराम महाराजांच्या (Sant Tukaram Maharaj) मूर्तीचे आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदीचं देहूमध्ये आगमन होणार आहे. मोदींनी येत्या 14 जूनची वेळ दिली आहे, अशी माहिती देहू संस्थानकडून (Dehu Sansthan) देण्यात आली आहे. देहू संस्थानने मार्च महिन्यात मोदींना दिल्लीत जाऊन आमंत्रण दिलं होतं. ते आमंत्रण आता त्यांनी स्वीकारलं आहे. (Prime Minister Narendra Modi To Arrive In Dehu )

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत. त्या मंदिराची पायाभारणी प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) यांनी राष्ट्रपती असताना केली होती. तेव्हापासून सुरु असलेल्या कामाला कोरोनाच्या महामारीमध्ये (Coronavirus) चांगली गती मिळाली होती. संपूर्ण दगडात तेही कोरीव काम करुन हे मंदिर उभारलेलं आहे. याचे आता मोदींच्या हस्ते लोकार्पण केले जाणार असल्याची शक्यता आहे.

29 मार्च रोजी संत तुकाराम महाराज संस्थान (Sant Tukaram Maharaj Sansthan) आणि आचार्य तुषार भोसलेनी (Acharya Tushar Bhosale) पंतप्रधान मोदींना (PM Modi Visit To Dehu) निमंत्रण देण्यासाठी दिल्लीला गेले होते. तेव्हा पंतप्रधानांनी मी येईन असा शब्द दिला होता. तोच शब्द मोदींनी पाळल्याचं सांगतिलं जात आहे. आषाढी वारी पूर्वी अर्थात 14 जूनला मोदींनी तशी वेळ दिली आहे. यामुळे हा लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. तसेच, अनेक दिंड्यांना यावेळी आमंत्रित केलं जाणार आहे. यासाठी संस्थाकडून तयारी केली जात आहे.

Web Title : Prime Minister Narendra Modi To Arrive In Dehu

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर